पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 09:28 PM2022-09-04T21:28:13+5:302022-09-04T21:29:39+5:30

सहा महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह.

Husband strangulates his wife, a shocking incident in Nalasopara | पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Next

मंगेश कराळे
नालासोपारा : शहरात २५ वर्षीय पतीने २२ वर्षीय पत्नीची रविवारी पहाटेच्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला ताब्यात घेतले असून चौकशीसह तपास करत आहे.

नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोडवरील विनय काँप्लेक्समधील आनंद व्हीव बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाविक ठक्कर (२५) याने त्याची पत्नी मुन्नी (२२) हिची हत्या केली आहे. भाविकची फेसबुकवरून या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. भाविक ठक्कर हा गुजराती असून लग्नानंतर त्याची पत्नी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागल्याचे सूत्रांकडून कळते.

भाविक याच्या पत्नीला काही कारणास्तव वीस हजार रुपये हवे होते. या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर त्याने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात तिला जोरात तोंडावर चापट मारून सोफ्यावर पाडून दोन्ही हाताने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपी पतीने ही घटना इमारतीतील इतर रहिवाशांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पतीने पत्नीची घरगुती भांडणाच्या रागातून हत्या केली आहे. आरोपी पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांची चौकशी व तपास सुरू आहे. - विलास सुपे
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

Web Title: Husband strangulates his wife, a shocking incident in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.