विद्यार्थ्यांनी बनवली हायब्रीड बाइक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:41 AM2019-09-15T00:41:05+5:302019-09-15T00:41:14+5:30
रुस्तमजी अकाडमी फॉर ग्लोबल करियर या शैक्षणिक संस्थेतील आॅटोमोबाइल डिप्लोमा शाखेच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड बाईक बनवली
डहाणू/बोर्डी : रुस्तमजी अकाडमी फॉर ग्लोबल करियर या शैक्षणिक संस्थेतील आॅटोमोबाइल डिप्लोमा शाखेच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड बाईक बनवली असून ती पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही पद्धतीने चालते. त्यामुळे ती विशेष असल्याचे मत तिची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, इंधन दरवाढ आणि पर्यावरण संवर्धनात तिचे महत्व अधोरेखित होत असल्याने बाजारात तिचे स्वागत होईल.
आजची तरु णपिढी ही पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांच्याकरिता काही वेगळे देण्याच्या प्रयोजनातून ही बाईक आकाराला आल्याचे भाग्येश अनिल पाटील, प्रणीत शिरीष आंब्रे, हर्ष परेशकुमार प्रजापती आणि प्रणव आशिष कंसारा या विद्यार्थ्यांनी सांगितले. यापूर्वीही बाजारात हायब्रीड बाईक आहेत, मात्र त्यापेक्षा यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे पेट्रोलवरील खर्च तर वाचेलच शिवाय ती विजेवर धावत असल्याने वायू व ध्वनी प्रदूषण मुक्तीचा हेतू साध्य होईल असे या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. रामकृष्ण बंडीकोला, प्रा. चिराग महाले यांचे म्हणणे आहे.
१५० सीसी बाईकच्या वापरतून ही डबल पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. डीसी इलेक्ट्रीक हब मोटार रियर व्हील मध्ये वापरली असून चाकाच्या मध्यभागी बसवल्याने नॉर्मल व्हील सारखी दिसतेच. शिवाय कमी जागा व्यापते. यामध्ये बरेच फिचर वापरल्याने आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअरच्या वापरातून प्रोग्रामिंग शक्य आहे. तर मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिजवरेटीव्ह पॉवरने लिथियम आयर्न बॅटरीला चार्ज करते.
ही बाईक इंजिनवर चालताना मोटरमधील रिजनरेट पॉवर, रिजनरेटीव्ह कंट्रोलद्वारे घेऊन लिथियम आयर्न बॅटरीला चार्ज करण्यास पाठवते. ती ३० किमी अंतर कापण्याकरिता ४० किमी तासाच्या वेगाने चालताना लिथियम आयर्न बॅटरी पूर्ण चार्ज करते. तिचा बॅकअप चांगला असल्याचा दावा त्यांनी केला असून ४० ते ४५ किमी अंतर कापताना तासाला ७० किमीचा वेग देते. हे करताना रस्त्याची स्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. प्लग इन हा दुसरा पर्यायही येथे दिला आहे. बॅटरीचा आकार पहिल्यांदाच व्ही या इंग्रजी अक्षरासारखा केला आहे. तर बॅटरीचा वेग नियंत्रणात आणण्याकरिता इलेक्ट्रिÑक थंब थ्रोटल हा हँडच्या आधी बसवला आहे. दोन्हीपैकी एक पद्धत वापरताना वेग कमी करणे गरजेचे आहे. शिवाय भविष्यात नवीन तंत्रज्ञानही वापरता येऊ शकेल.