मी हुकूमशाही नाही तर मर्दासारखा लढतो, गल्लीची शिट्टी दिल्लीला वाजणारच - आमदार हितेंद्र ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 06:23 PM2024-05-15T18:23:03+5:302024-05-15T18:23:55+5:30

मी हुकूमशाही नाही करत मी मर्दासारखा लढतो, गल्लीतील शिट्टी ही दिल्लीला वाजणारच असे बोलत वसईकरांना निपटून टाकू ते काय गाजर, मुळी आहे का ? राज्यसभा आणि विधानपरिषदसाठी वसईला का आले होते असा समाचार घेत ठाकुरांनी घणाघात केला आहे.

I fight like a man, not a dictatorship, street whistle will blow in Delhi says MLA Hitendra Thakur | मी हुकूमशाही नाही तर मर्दासारखा लढतो, गल्लीची शिट्टी दिल्लीला वाजणारच - आमदार हितेंद्र ठाकूर

मी हुकूमशाही नाही तर मर्दासारखा लढतो, गल्लीची शिट्टी दिल्लीला वाजणारच - आमदार हितेंद्र ठाकूर

मंगेश कराळे -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचे प्रत्युत्तर देण्यासाठी बविआ अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांव पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पैसे गोळा करण्याचे आरोप केले आहेत. मी हुकूमशाही नाही करत मी मर्दासारखा लढतो, गल्लीतील शिट्टी ही दिल्लीला वाजणारच असे बोलत वसईकरांना निपटून टाकू ते काय गाजर, मुळी आहे का ? राज्यसभा आणि विधानपरिषदसाठी वसईला का आले होते असा समाचार घेत ठाकुरांनी घणाघात केला आहे.

कंत्राटदार, मनपा आणि पीडब्ल्यूडी अधिकारी यांना प्रत्येकी २० कोटी रुपये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागितले असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकुरांनी केला आहे. लाईट, पाणी बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकायचा आणि बहुजन विकास आघाडीचे नाव बदनाम करण्याचा अजेंडा सेना, बीजेपीने चालविला असल्याचा आरोपही त्यांनी केला. चिटिंग करून लढण्यापेक्षा चांगल्या मनाने, इमानदारीने माझ्यासोबत लढा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मुलगा पर्यावरण मंत्री आणि सुभाष देसाई उद्योग मंत्री होते मग वाढवण बंदर का रद्द केले नाही ? आता विरोध दाखवायचा ही फक्त नाटके असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेचाही समाचार घेतला. ते वसईला काय निपटवणार मी त्यांना निपटवणार असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकुरांनी हल्ला केला आहे.

Web Title: I fight like a man, not a dictatorship, street whistle will blow in Delhi says MLA Hitendra Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.