सर्पमित्रांना ओळखपत्र, प्रशिक्षणाची गरज

By Admin | Published: November 22, 2015 12:07 AM2015-11-22T00:07:38+5:302015-11-22T00:07:38+5:30

सर्पप्रेमापोटी ओळखपत्र अथवा साप हाताळण्याचे प्रशिक्षण नसताना जीवावर उदार होऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावचे सर्पमित्र करतात. जीवाला धोका आणि कायदेशीर

Identity card for teachers, training needs | सर्पमित्रांना ओळखपत्र, प्रशिक्षणाची गरज

सर्पमित्रांना ओळखपत्र, प्रशिक्षणाची गरज

googlenewsNext

बोर्डी : सर्पप्रेमापोटी ओळखपत्र अथवा साप हाताळण्याचे प्रशिक्षण नसताना जीवावर उदार होऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावचे सर्पमित्र करतात. जीवाला धोका आणि कायदेशीर आधार नसल्याने सर्पमित्रांवर टांगती तलवार असते. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन सर्पमित्रांना प्रशिक्षित करण्याची मागणी वाढत आहे.
रंग, आकार, लांबी, रुंदी इ. वैविध्यतेनुसार भारतात २७८ जातींचे साप आढळतात. यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापटा, समुद्रसाप इ. विषारी जाती आहेत. पालघर जिल्ह्यात पसरलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदा आणि अथांग समुद्रकिनारा इ. जैवविविधतेमुळे वाळ्यापासून अजगरापर्यंत सर्व प्रकारचे साप आढळतात.
हिंदू धर्मात सापाला देव माणून पूजा केली जाते. मात्र, लोकवस्तीनजीक सापाचा वावर आढळल्यास मारण्याची प्रवृत्ती बळावते. तर, सर्पप्रेमापोटी काही युवकांनी घर, गोठा, उद्यान इ. ठिकाणांहून सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावी सुरू केले आहे.
डिस्क व्हरी वाहिनी आणि वन्यजीवरक्षक संस्थांच्या कार्याने प्रेरित केले आहे. साप पकडण्याचे ओळखपत्र नसल्याने कायदेशीर अडचण आणि साप हाताळण्याच्या प्रशिक्षणाअभावी अपघात घडून जीवावर उदार होण्याचा धोका आहे. गतवर्षी डहाणूतील महेंद्र पाटील (४५) या सर्पमित्राचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. जीव गेलाच, मात्र आर्थिक मदत पाटील यांच्या कुटुंबीयांना मिळाली नाही.
दरम्यान, राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत वन्यव्यवस्थापन समिती स्थापन करून वृक्ष संवर्धनाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. सदर समितीत दोन सर्पमित्रांची नेमणूक करून वन विभागामार्फत
ओळखपत्र तसेच सापांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्यास कार्याला चालना मिळेल.
प्रशिक्षित सर्पमित्र सापाची ओळख, घरात साप आल्यास काय करावे, सर्पदंश टाळणे, सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार इ. माहिती नागरिकांना देऊन जनजागृती करू शकतील. (वार्ताहर)

डहाणू तालुक्यातून प्रतिदिन सरासरी
दहा सर्पांना लोकवस्तीतून सर्पमित्रांनी सोडवण्याच्या अधिकृत नोंदी आहेत. लोकमतच्या पुढाकाराने वन विभागाकडून सर्पमित्रांना ओळखपत्र व प्रशिक्षण मिळाल्यास पथदर्शी
घटना ठरेल.
- धवल कसारा,
संस्थापक, वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन

Web Title: Identity card for teachers, training needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.