टँकर न दिल्यास उपोषण करणार
By admin | Published: March 8, 2017 03:01 AM2017-03-08T03:01:28+5:302017-03-08T03:01:28+5:30
महिन्याभरापूर्वी मागणी करूनही पाणीटंचाईग्रस्त गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी निद्रेमुळे अजूनही टँकर मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे गावपाडे पाण्यासाठी प्रचंड
मोखाडा : महिन्याभरापूर्वी मागणी करूनही पाणीटंचाईग्रस्त गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी निद्रेमुळे अजूनही टँकर मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे गावपाडे पाण्यासाठी प्रचंड वणवण करीत आहेत. त्यांना येत्या दोन दिवसात टँकरने पाणी पुरवठा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
मार्चमध्येच निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा अशा १३ गावपाडयांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी मोखाडा पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली असून याचे प्रस्ताव मोखाडा तहसीलदारांनी जिल्हाधिकारऱ्यांकडे पाठविले आहेत. या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे बंधनकारक असतांना देखील प्रशासन मात्र ढिम्म आहे. (वार्ताहर)