अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 10:41 PM2019-01-07T22:41:14+5:302019-01-07T22:41:43+5:30

अचानक कारवाई झाल्याने वाहनचालक संतप्त : दंडाची वसुली जनतेच्या सुरक्षिततेसाठीच

If the vehicle is taken from Ambalani Railway Bridge, 200 'jhobbo' | अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

Next

वसई : जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेकडून पुलावरील भार काढण्यास १३ आॅक्टोबर पासून सुरवात करण्यात आली होती. मात्र थातूमातूर काम केल्यानंतर पुन्हा या पुलाच्या डागडुजीचे काम रखडले आहे. नवीन वर्षात सोमवारपासून (दि.7) या पूलावरून वाहने चालविण्या-यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी असतानाही दुचाकी व चारचाकी वाहनचालक आपली वाहने सर्रास पूलावरून नेत आहेत .वाहतूक पोलिसही या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत होते. १३आॅक्टोबर पासून जुन्या अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या केबल्स, खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले होते. या पुलाच्या पश्चिम दिशेकडील लोखंडी बॅरिकेडस काढण्यात आल्यामुळे सुरवातीला दुचाकी वाहनचालकांनी या पुलावरून वाहने नेण्यास सुरूवात केली. गाड्या नेतांना वाहतूक पोलिस अटकाव करत नसल्याचे पाहून चारचाकी वाहनेही या पुलावरून राजरोसपणे नेत होते. मात्र सोमवारपासून पुलाच्या पश्चिम दिशेकडून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस लाऊन पूलावरून वाहने चालवणा-या चालकांना २०० रुपये दंड करण्यास सुरूवात केली आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. त्या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ३८ वर्षाचा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र अनेक महिने उलटूनही जुन्या पुलाची दुरूस्ती सुरू न झाल्याने नागरिकाकडून संताप व्यक्त होत होता.

दंड न करता फक्त समज देऊन सोडा!
च्अनेक दुचाकीस्वारांची वाहतूक पोलिसांसोबत तू तू मै मै सुरू होती. एकेरी वाहतूक प्रवेश बंद मार्गावरून वाहने नेल्यामूळे दोनशे रूपये दंड आकारला जात असतांना, या उड्डाणपूलाच्या पूर्वेकडून, औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या मार्गावर कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता, तसेच अवैधरीत्या गॅरेजवाल्यांनी पार्किंग केलेल्या गाड्यांवर मात्र वाहतूक पोलिसांची खास मर्जी असल्याचा आरोप आता वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. रायझींग सप्ताहात तरी दंड न करता समज देऊन सोडावे असेही म्हटले गेले.

Web Title: If the vehicle is taken from Ambalani Railway Bridge, 200 'jhobbo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.