खूनप्रकरणी गुन्हा तर; मृताविरोधात विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:38 PM2019-01-04T23:38:57+5:302019-01-04T23:39:07+5:30
कळमपेढी येथील आपल्या शेतात प्रभाकर म्हसकर आपल्या पत्नीसोबत रहात असून २ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ते झोपले असताना मृत उमतोल मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या झोपडीत शिरला.
पालघर : पडघा (कळमपेढी) येथील प्रभाकर म्हसकर (५५) याच्या घरात रात्री घुसून त्याच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिलीप उमतोल (३६) याच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा फटका मारून त्याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्या प्रकरणी म्हसकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कळमपेढी येथील आपल्या शेतात प्रभाकर म्हसकर आपल्या पत्नीसोबत रहात असून २ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ते झोपले असताना मृत उमतोल मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या झोपडीत शिरला. त्याने झोपलेल्या म्हसकर याच्या पत्नीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता तिने आपला बचाव करण्यासाठी आरडाओरड केली शेजारीच झोपलेल्या तिच्या पतीला आपल्या पत्नीच्या आवाजाने जाग आली. आपल्या पत्नीशी एक व्यक्ती झोम्बाझोम्बी करीत असल्याचे त्यांनी पाहिल्यावर शेजारीच असलेल्या चुलीतील दांडूका काढून त्याच्या डोक्यात हाणला. तो रक्तबंबाळ झाल्याने आरोपीच्या घरात तो जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पाड्यात सकाळी पसरली. त्याला उपचारासाठी प्रथम पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आल्या नंतर त्याला अधिक उपचाराची गरज असल्याने वलसाड येथील रु ग्णालयात नेण्यात आले.
तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. या खुनाच्या प्रकरणी आरोपी प्रभाकर म्हसकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर मृत दिलीप उमतोल याच्या विरोधात आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्र ारी वरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी दिली.