बेकायदा बांधकाम : शिवसेना विधानसभा संघटकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:40 PM2019-09-28T23:40:58+5:302019-09-28T23:41:27+5:30
शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांच्याविरोधात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वसई : शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांच्याविरोधात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वसई- विरार महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त यांनी विरार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दळवी हे शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. एकीकडे शिवसेना सातत्याने बहुजन विकास आघाडी व बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत आहे तर येथे शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याला बेकायदा बांधकाम व त्यासाठी कागदपत्रांत हेराफेरी केल्याचा गुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखल झाल्याने हा मुद्दा प्रचारात चांगलाच गाजणार आहे.
विरार पूर्वेकडील सेंट पीटर शाळेच्या बाजूला असलेल्या जागेवर दळवी यांनी गौरी पॅलेस ही चार मजली बेकायदा इमारत बांधली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर ही इमारत बांधण्यासाठी बोगस दस्तऐवजही तयार केले होते. याच दस्तऐवजाच्या आधारे नागरिकांना विक्र ी करून त्या इमारतीतील सदनिकाची नोंदणीही करण्यात आली. अशाप्रकारे दळवी यांनी महापालिका व सरकारचा महसूल बुडवला असून ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा याच भागातील रहिवासी असलेले राजेंद्र पुरव तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करीत होते.