माणिकपुरात बेकायदा डम्पिंग ग्राउंड
By admin | Published: January 23, 2017 05:12 AM2017-01-23T05:12:56+5:302017-01-23T05:12:56+5:30
माणिकपूर शहरात शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या एका मोकळ्या मैदानात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून
वसई : माणिकपूर शहरात शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या एका मोकळ्या मैदानात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून त्यात मेडिकल वेस्टचे प्रमाण अधिक आहे. माणिकपूर पोलिसांनी अशा रितीने कचरा बेकायदेशीर टाकणारी एक गाडी जप्त केली आहे.
शंभर फुटी रस्त्याजवळ मोकळे मैदान आहे. त्याठिकाणी दररोज ट्रक, टेम्पो आणि डंपरमधून कचरा आणून टाकला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम मुळीक यांनी पालिका आणि पोलिसांकडे केली आहे. तसेच कचरा टाकणाऱ्या गाड्यांचे फोटोही दिले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करून एक गाडी जप्त करण्यात आली.
याठिकाणी मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणावर टाकले जाते. हा कचरा आरोग्यासाठी हानीकारक असल्याने त्यांनी कचरा टाकणाऱ्या गाडी चालक आणि कामगारांना हटकले होते. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना पाठवून तक्रार केली होती. पण, महापालिकेकडून कोणतीच कारवाई झाली नाही, असा त्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)