विकासकाच्या फायद्यासाठी चक्क रस्ताच बेकायदेशीर सरकवून दिली बांधकाम परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 07:28 PM2021-12-04T19:28:34+5:302021-12-04T19:28:42+5:30

मीरा भाईंदर महापालिकेचा आणखी एक घोटाळा. तब्बल १३ मजली इमारतीच्या बांधकामाची परवानगी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे . 

Illegal sliding of the road for the benefit of the developer, gave Building permission in mira bhaindar municipal | विकासकाच्या फायद्यासाठी चक्क रस्ताच बेकायदेशीर सरकवून दिली बांधकाम परवानगी

विकासकाच्या फायद्यासाठी चक्क रस्ताच बेकायदेशीर सरकवून दिली बांधकाम परवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हि वादग्रस्त आणि घोटाळेबाज म्हणून सतत चर्चेत असते . आता देखील महापालिका व विकासक आदींनी संगनमत करून विकासकाला प्रचंड फायदा करून देण्यासाठी विकास आराखड्यातील रस्ताच स्थानिक महिलेच्या जागेत परस्पर वळवत विकासकास तब्बल १३ मजली इमारतीच्या बांधकामाची परवानगी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे . 

भाईंदर पूर्वेच्या विमल डेअरी मार्गावर राधा कॉम्प्लेक्स नाक्यावर एक रस्ता गोडदेव गावा कडे तर एक रस्ता नवघर गावाकडे जातो . पालिका विकास आराखड्यात  सदर नाक्या वरून गोडदेव भागातून जाणारा १८ मीटरचा रस्ता आरक्षित आहे . ह्या विकास आराखड्यातील रस्त्याची आवश्यकता असताना देखील त्यात काही अनधिकृत बांधकामे महापालिका आणि नगरसेवक , राजकारणी आदींच्या आशिर्वादाने राजरोस बांधून झाली आहेत. 

एकीकडे सदर बेकायदा बांधकामे पाडून विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याची गरज असताना महापालिका बेकायदा बांधकामना संरक्षण देत आहे. दुसरीकडे राधा कॉम्प्लेक्स समोरील रस्त्या लगत मौजे गोडदेव सर्वे क्र. ७९ हिस्सा १ मध्ये हिया डेव्हलपर्स ला  विकासकाच्या प्रचंड आर्थिक फायद्यासाठी विकास आराखड्यातील रस्ताच नंदिनी पाटील आधवडे यांच्या मालकी हक्काच्या जागेत परस्पर बेकायदेशीर रित्या दाखवून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे १३ मजल्याच्या इमारतीची बांधकाम परवानगी संगनमताने देण्यात आली आहे. तशी तक्रार नंदिनी यांनी महापालिकेस केली आहे.  

हिया डेव्हलपर्स ही माजी महापौर डिंपल मेहता यांचे पती विनोद मेहता यांच्याशी संबंधित आहे. शिवाय विनोद हे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. राजकीय वजन असल्याने तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकरयांनी नगररचना चे तत्कालीन कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते यांनी सादर प्रस्तावावर सत्यस्थिती जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून परवानगी दिली आहे. 

विकास आराखड्यातील रस्ता दुसरीकडे वळवण्या साठी सर्वेयर मेसर्स एम. बी. राणे  , सल्लागार अभियंता में अनिश अँड असोसिएट्स तसेच विकासक यांनी खोटा दिशाभूल करणारा सर्वेयर नकाशा तसेच चुकीची कागदपत्रे सादर केली. तसेच नंदिनी यांची जमीन विकासक यांची असल्याचे भासवले. 

शिवाय रस्ता चक्क लघुकोनात वळवला आणि प्रत्यक्ष जागेवरील रस्ते -, जोडरस्ते आदींचा जाणीवपूर्वक विचार केला गेला नाही. जेणे करून भविष्यात विकास आराखड्यातील हा रस्ता वळवल्याने रहदारी व वाहतुकीसाठी सुद्धा गैरसोयीचा व घातक ठरणार असल्याचे नंदिनी यांनी तक्रारीत म्हटले आहे. बांधकाम परवानगी रद्द करून संबंधित यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title: Illegal sliding of the road for the benefit of the developer, gave Building permission in mira bhaindar municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.