चाळ पाडून बांधले अवैध इमले

By admin | Published: January 24, 2017 05:21 AM2017-01-24T05:21:33+5:302017-01-24T05:21:33+5:30

जुनी चाळ तोडून त्यावर अनधिकृत इमारती उभारून जुन्या रहिवाशांना बेघर करण्याचा बिल्डरचा डाव जन आंदोलन समितीच्या

Illegitimate building | चाळ पाडून बांधले अवैध इमले

चाळ पाडून बांधले अवैध इमले

Next

वसई : जुनी चाळ तोडून त्यावर अनधिकृत इमारती उभारून जुन्या रहिवाशांना बेघर करण्याचा बिल्डरचा डाव जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्याने उघडकीस आणला असून, याप्रकरणी पालिका दुर्लक्ष करित असल्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील समेळपाडा-लिटील फ्लॉवर शाळेच्या मागे घन्सार चाळ नावाची दुमजली इमारत होती. जुना सर्व्हे क्र.५६ आणि नवीन ११ हिस्सा क्र.६ पैकी या जागेवर असलेली ही चाळ तोडून त्यात जुन्या रहिवाशांना नवीन घरे देण्याचे आमिष बिल्डरने दाखवले होते. तोपर्यंत जुन्या रहिवाशांनी इतरत्र भाड्याने राहण्याची आणि त्या-त्या फ्लॅटचे भाडे देण्याचे त्याने मान्य केले होते.
काही महिने भाडे दिल्यानंतर या बिल्डरने भाडे देण्याचे बंद केले. तसेच चार वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याने जुन्या रहिवाशांना नवीन घरेही दिली नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असतानाही भाड्याच्या घरात स्वखर्चाने राहण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegitimate building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.