खोटं हे खरं असल्याचं बिंबवणे म्हणजे अभिनय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:26 AM2018-04-24T00:26:33+5:302018-04-24T00:26:33+5:30
आभास निर्माण करणे आणि खोटं खोटं इतकं प्रामाणिकपणे करणे की खरं वाटलं पाहिजे. यालाच तर अभिनय म्हणतात.
पालघर : नट एका दिवसात किंवा एका शिबीरात तयार होत नसतो. तो कामं करत करत तयार होत असतो. आणि परिपूर्ण अभिनेता असा कुणीच नसतो. प्रत्येक प्रयोगा अंती तोही शिकतो. असे मत जेष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते विक्र म गोखले यांनी विरार येथे व्यक्त केले
अभिनय म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. या बाबत आपले बरेच अपसमज, गैरसमज असतात. आभास निर्माण करणे आणि खोटं खोटं इतकं प्रामाणिकपणे करणे की खरं वाटलं पाहिजे. यालाच तर अभिनय म्हणतात. आपण भूमिका करतो आहोत याचं भान प्रत्येक क्षणाला नटाला राखता आलं पाहिजे.असे आज ते अमेय क्लासिक क्लब व अमेय कला अकादमी यांनी आयोजित केलेल्या नाट्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे उदघाटक म्हणून बोलत होते.
अमेय क्लबने हाती घेतलेला हा उपक्र म नव्या पिढीला लाभदायक ठरावा आणि तो कायम स्वरूपी चालू रहावा अशा अपेक्षाही त्यांनी ह्यावेळी बोलून दाखिवल्या. प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या छोट्या मोठ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
याच शिबिरात आपण परत एकदा एक दिवसासाठी येणार असल्याची सुखद घोषणाही त्यांनी केली. या शिबीरात प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. अमेय क्लबच्या संचालिका ग्रिष्मा पाटील यांनी प्रास्ताविक केलेल्या या उदघाटन सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष व प्रथम महापौर राजीव पाटील यांनी कला विभागात आपण वर्षभर चालेल असा कार्यक्र म आखणार असल्याचे सांगितले.
अभिनय शिकवणे हे कठीण काम असते पण ती कला अवगत करणे शक्य आहे. विक्र मजीं सारखे शिक्षक आपल्या भागातील गुणवंतांना लाभले आहेत याचा फायदा घ्यावा आणिआपले व्यक्तिमत्व व जीवनमान अधिक प्रभावी करावे असे आवाहनही त्यांनी केले. शिबिराचे समन्वयक हेमंत चिटणवीस यांनी शिबीराचे स्वरु प स्पष्ट करताना सर्व प्रशिक्षकांचा परिचय करून दिला. नाट्य लेखिका भारती देशमुख यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन तर राजीव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. जिल्हा योग प्रशिक्षण संघटनेचे अध्यक्ष संजीव पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, संतोष पिंगुळकर,ई. मान्यवरही या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. अभिनेते विक्र म गोखले यांचा अमेय क्लब व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.