भाईंदरमध्ये गणपतीची वर्गणी चोरली, पावतीपुस्तकासह कागदपत्रेही नेली
By धीरज परब | Published: September 8, 2022 06:58 PM2022-09-08T18:58:26+5:302022-09-08T18:59:26+5:30
६ सप्टेंबर रोजी इमारतीच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेण्यासाठी ते गेले असता डिकी तोडलेली व पेट्रोल टाकण्याच्या टाकीचे झाकण उघडे दिसले.
मीरारोड - सार्वजनिक गणपती मंडळाची जमलेली वर्गणी दुचाकीची डिक्कीमधून चोरण्यात आल्याची घटना भाईंदरच्या इंद्रलोक भागात घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक नाका भागात युथ पँथर मित्र मंडळ आहे. मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो . मंडळाचे खजिनदार अभिषेक राय (२७) रा. चंदनपार्क , भाईंदर पूर्व यांनी मंडळाची जमलेली ८ हजार रुपयांची वर्गणी, पावती पुस्तक आदी त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवले होते.
६ सप्टेंबर रोजी इमारतीच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेण्यासाठी ते गेले असता डिकी तोडलेली व पेट्रोल टाकण्याच्या टाकीचे झाकण उघडे दिसले. डिक्कीत तपासले असता वर्गणीची ८ हजार रोख , पावती पुस्तक व दुचाकीची कागदपत्रे चोरीला गेलेले होते. ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री अभिषेक यांच्या फिर्यादी नंतर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस तपास करत आहेत .