विनयभंगाचा गुन्हा सिद्ध, २२ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 05:31 PM2024-07-05T17:31:27+5:302024-07-05T17:32:08+5:30
२ फेब्रुवारी २००२ साली चार आरोपींनी २६ वर्षीय महिलेला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अश्लिल चाळे करून विनयभंग केला होता.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- गँगरेपच्या गुन्ह्यात तब्बल २२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे.
२ फेब्रुवारी २००२ साली चार आरोपींनी २६ वर्षीय महिलेला जबरदस्तीने रिक्षात कोंबून तानिया टाऊनकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेऊन आळीपाळीने जबरी संभोग करून तिच्याशी अश्लिल चाळे करून विनयभंग केला होता. नंतर तिला ठोशाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. नालासोपारापोलिसांनी याप्रकरणी गँगरेप व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी राजू राठोड, धीरज गिरी या दोघांना अटक करून दोषारोपपत्र वसई न्यायालयात दाखल केले होते. परंतु शंकर तसेच मायकल हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना मिळून आला नव्हता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर संवेदनशील गुन्ह्यातील पाहीजे आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने मध्यवती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी अधिकारी अंमलदार यांचे पथक तयार केले. सदर पथकाने सदर गुन्ह्याची नालासोपारा पोलीस ठाण्यातून माहीती घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेत असताना मायकल याचे नाव मायकल उर्फ टिप्पू राम शिरोमण पाण्डेय असे असल्याची माहीती मिळाली. त्यांनतर सलग १ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेवून तपासात सातत्य ठेवून आरोपी हा नालासोपारा परिसरात रिक्षा चालवत असून तो कोणत्यातरी मंदीरात राहत असल्याची माहीती मिळाली. या पोलीस पथकाने मागील ५ दिवसापासून रेल्वे स्टेशनजवळील ऑटो रिक्षा स्टॅण्ड येथे बातमीदारासह पाळत ठेवुन सापळा लावून आरोपी मायकलला बुधवारी दुपारी शिताफीने ताब्यात घेतले. तपासात आरोपीचा गुन्ह्यात सहभाग दिसून आला. त्याचे पूर्ण नाव विनोदकुमार राम शिरोमण पाण्डेय ऊर्फ मायकल ऊर्फ टिप्पू (४६) असे असून तो टिका महाराज मंदीर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील कारवाईसाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरणाचे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पो.नि धनांजय पोरे, सपोनि दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोउपनिरी हितेंद्र विचारे, श्रीमंत जेथे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, संतोष मदने, हनुमंत सूर्यवंशी, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, राजविर संधू, प्रविणराज पधार, सतिष जगताप, राजाराम काळे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिय नागरे, अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब सचिन चौधरी यांनी केली आहे.