दुचाकी, घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ४ गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 05:16 PM2024-06-14T17:16:19+5:302024-06-14T17:17:54+5:30

नालासोपारामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दुचाकी, घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केले आहे.

in nalasopara two wheeler and house burglary suspect arrested 4 crimes to be solved | दुचाकी, घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ४ गुन्ह्यांची उकल

दुचाकी, घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ४ गुन्ह्यांची उकल

नालासोपारा (मंगेश कराळे) :-नालासोपारामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दुचाकी, घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ३ दुचाकी आणि घरफोडीतील सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी दिली.

२४ मे ते ८ जून दरम्यान नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील चावरे पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, वाहन चोरीच्या वाढत्या घटना पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर गुन्हे उघडकीस करण्याचे आदेश दिले आहे. नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे, तांत्रिक बाबी व महितीदाराच्या आधारे चार गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी सल्लाउद्दीन उर्फ सल्ला खान (२७) याला ९ जूनला अटक करण्यात आली. या आरोपीवर यापूर्वीही नालासोपारा पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचे ६ गुन्हे दाखल आहेत.आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर ३ वाहन चोरी आणि १ घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल,   पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, बाबासाहेब बनसोडे, प्रताप शिंदे यांनी केली आहे.

Web Title: in nalasopara two wheeler and house burglary suspect arrested 4 crimes to be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.