कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान

By धीरज परब | Published: January 30, 2023 07:45 PM2023-01-30T19:45:39+5:302023-01-30T19:46:31+5:30

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान झाले आहे.

 In the Konkan Shikshak Constituency election, Mira Bhayandar has 91 percent voter turnout | कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान

Next

मीरारोड : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकसाठी सोमवारी मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के इतके मतदान झाले. मीरा भाईंदर शहरासाठी भाईंदरच्या अपर तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. १०७६ शिक्षक मतदारां पैकी ९७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी मोठी रांग लागली होती. मतदान केंद्रा बाहेर भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे तर महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ बूथ लागले होते. 

४ वाजता मतदानाची वेळ संपली. मतदान शांततेत पार पडले. मतदान केंद्रावर एक पोलीस अधिकारी, ४ अंमलदार व ५ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 

Web Title:  In the Konkan Shikshak Constituency election, Mira Bhayandar has 91 percent voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.