ढासळत्या ‘सूर्या’तून अपुरा पाणीपुरवठा, १० वर्षांत देखभाल दुरुस्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:31 AM2018-03-03T02:31:50+5:302018-03-03T02:31:50+5:30
डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो.
शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्याचा शेतीला फटका बसत आहे. कासा जवळील सूर्या नदीवर धामणी येथे ४० वर्षांपूर्वी धरण बांधण्यात आले. सिंचन हा प्रमुख उद्देश ठेऊन हे धरण बांधण्यात आले. आणि १४ हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा हेतू होता.
डहाणू तालुक्यातील तवा, पेठ, धामटने, कोल्हान, सोनाळे, खाणीव, कासा, चारोटी, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, साये, म्हसाड, दाभोण, ऐना, साखरे, घोळ, भराड,रानशेत, आदी ठिकाणी तर पालघर तालुक्यातील आंबेदा, नानीवली, बºहाणपूर, आकेगव्हान, चिंचारे, सोमटा, बोरशेती, कुकडे, महागाव आदी गावांना अश्या एकूण ७० ते ८० गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा केला जातो. शेतकरी सदर काळव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती बरोबरच भाजीपाला, भुईमूग आदी पिके घेतात. मात्र गेल्या १० वर्षांपासून कालव्यांची दुरु स्तीच केली जात नसल्याने ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत आहे.
काही ठिकाणी कालवे उथळ व गेट तुटल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे शेवटच्या भागापर्यंत पाणी जातच नाही. कालव्यातून होणार पाण्याचा निचरा रोखण्यासाठी मुख्य कालवे व उप कालव्यांचे सिमेंटने बांधकाम केले होते. मात्र, वेळोवेळी दुरु स्ती व सफाई न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम, प्लॅस्टर वाहून व तुटून गेले आहेत.
>अपुरा पाणीपुरवठा; शेतीला बसला फटका
सारणी, उर्से म्हसाड, आंबिवली, साये, घोळ, भराड , आदी ठिकाणी तर कालव्यांचे पूर्ण बांधकाम व प्लॅस्टर तुटून गेले आहे. तर पेठ, धामटने, घोळ, नानिवली, चिंचारे, आदी ठिकाणी तर कालव्याचे शेतीला पाणीपुरवठा करणारे गेट नादुरु स्त झाले आहेत तर काही ठिकाणी तुटून गेले आहेत. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणी शेतीला न जाता वाया जात आहे. तसेच बºयाच ठिकाणी सतत गाळ साचल्याने कालवे नादुरु स्त झाले आहेत. गेट, मोºया गाळाने भरल्याने पाण्याचा निचरा होतो त्यामूळे शेतीला वेळोवेळी पाणीपुरवठा होत नाही. तसेच कालव्यांच्या नादुरु स्ती मुळे कालव्यांना जोडणाºया अखेरच्या गावांना अर्धवट व अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशा गावांनी दोन वर्षपासून शेती करणे बंद केली आहे. त्यामुळे कालव्यांची दुरु स्ती अभावी शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असून त्याचा फटका शेतीला बसत आहे.