वसई विरार शहर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:25 PM2019-09-09T23:25:39+5:302019-09-09T23:25:44+5:30

दिवाणमान अंबाडी रोड येथे महापालिकेने जलतरण तलाव परिसरात दुसºया मजल्यावर अत्याधुनिक वातानुकुलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंजची उभारणा केलेली आहे.

Inauguration ceremony of various projects of Vasai Virar City Municipal Corporation | वसई विरार शहर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा

वसई विरार शहर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा

Next

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेने विकसित केलेल्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षीतिज ठाकूर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने तामतलाव येथे अद्यावत सेमी आॅलिम्पक दर्जाचा जलतरण तलाव उभारला असून सदर जलतरण तलावासाठी साडे चार कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पामध्ये जलतरण तलाव, बेबीजलतरण तलाव, इनडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी कामाचा समावेश आहे.

दिवाणमान अंबाडी रोड येथे महापालिकेने जलतरण तलाव परिसरात दुसºया मजल्यावर अत्याधुनिक वातानुकुलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंजची उभारणा केलेली आहे. त्यासाठी एक कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदरचा शुटींग रेंजमध्ये १० मी. एयर रायफल, एयर पिस्तोल, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग टार्गेट (थ्रीडी स्फोअर) ८ टार्गेटची सुविधा असणार आहे. वसई, पालघर, अंधेरी या परिसरामध्ये अशा प्रकारचे अत्याधुनिक शुटींग रेंज अस्तित्वात नाही. वसई विरार शहर महानगरपालिकेस श्वेतांबर स्थानिकवासी जैन संघाने आरोग्य केंद्रासाठी माणिकपूर वसई येथे सुमारे १२०० चौ.फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी रूग्णासाठी पूर्णवेळ फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असणार आहे. महानगरापलिकेच्या या सुविधामुळे नवघर माणिकपूर परिसरातील गोरगरिब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यानंतर आरोग्य केंद्र लोकापर्णाचा मुख्य कार्यक्रम समाज उन्नती मंडळ, माणिकपूर येथे होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्र मास उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर प्रवीण शेट्टी यांनी केले आहे. तसेच सकाळी ११ वाजता सनसिटी दिवाणमान ते वसई स्टेशन अशी महानगरपालिकेची बस सेवा चालू होणार असून त्याचे उद्घाटन प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर व माजी महापौर नारायण मानकर यांच्या हस्ते होणार आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्पोर्टस विषयक विकास कामांमुळे स्थानिक खेळांडूना स्थानिक पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धामध्ये भाग घेणे शक्य होईल. महापालिकेने गत वर्षाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी व घोषणांची अंमलबजावणी विहित मुदतीत होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलेले आहे.

Web Title: Inauguration ceremony of various projects of Vasai Virar City Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.