वसई विरार शहरात 89 नव्या रुग्णांची वाढ; 4 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 08:34 PM2020-08-28T20:34:10+5:302020-08-28T20:34:15+5:30
वसई विरार शहराची कोरोना मुक्तिकडे वाटचाल
Next
वसई: वसई विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक 4 रुग्णाचा मृत्यू झाला असून ही बाब चिंतेची आहे, तरी दिवसभरात फक्त 89 नवे रूग्ण आढळून आले व सर्वाधिक असे 186 रूग्ण मुक्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली.
महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 16 हजार 323 वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रूग्णसंख्या 14 हजार 141 इतकी झाली आहे. तर महापालिका हद्दीतील मृतांची संख्या आता एकूण 349 वर पोहचली असून शहरात विविध रुग्णालयात आता केवळ 1 हजार 833 रूग्ण उपचार घेत असल्यामुळे आता ही आकडेवारी वसई विरार शहराला कोरोना मुक्तीकडे नेत असल्याचे संकेत दिसत आहेत.