मोकाट जनावरांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:15 AM2019-05-30T01:15:17+5:302019-05-30T01:15:23+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी ते तलासरी दरम्यान मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.

Increased accidents on the Mumbai-Ahmedabad highway due to rowdy animals | मोकाट जनावरांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात वाढ

मोकाट जनावरांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात वाढ

googlenewsNext

कासा: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी ते तलासरी दरम्यान मोकाट जनावरांचा वावर वाढला असून त्यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस दिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्ग प्रशासनासह आयआरबी कंपनी मात्र दुर्लक्ष करत आहे. मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा सहा पदरी असून सतत या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.
सध्या उनळ्याचे दिवस असून गाव पाड्यातील गुरे ढोरे पाण्याच्या शोधात महामार्ग शेजारील शेतात आणि हिरवळ असलेल्या परिसरात फिरत असतात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी जुंपली जातात. मात्र चार महिन्यानंतर या जनावरांना मोकाट चरण्यासाठी सोडून देण्यात येत असल्याने ती जनावरे महामार्गावर आल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. याच व्यतिरिक्त महार्गावर दोन्ही बाजूच्या वाहिन्यांच्या मध्ये छोटी झाडे लावण्यात आलेली असल्याने हिरवळ पाहून मोकाट जनावरे रस्त्यावर येऊन चरताना अचानक वाहनांच्या समोर येऊन अपघात होतात. अशी मोकाट जनावरे काही ठिकाणी महार्गावर ठाण मांडून बसत असल्याने रात्री अपरात्री चालकाच्या लक्षात न आल्याने अपघात होतात तर कधी हॉर्न वाजवून ही उठत नाही. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन अनेक अपघातात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीने लक्ष घालणे गरजेचे आहे. महामार्गावर मोकाट फिरणाºया जनावरांच्या डोळ्यावर रात्रीच्यावेळी वाहनांचा उजेड पडल्यामुळे अनेक अपघात घडले. जनावरांसह चालकही गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या
आहेत.
स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोकाट जनावरामुळे अपघात घडत असल्यामुळे अनेकदा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा मोकाट महामार्ग लगतच्या ग्रामपंचायत प्रशासनाने व महार्गावर प्रशासनाने बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
कासा बाजारपेठेतही मोकाट जनावरांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कासा बाजारपेठ जवळ सायवन रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जनावरे येऊन रस्त्यावरच बसतात. त्यामुळे नागरीक व वाहनचालकांना मोठी अडचण होते.

Web Title: Increased accidents on the Mumbai-Ahmedabad highway due to rowdy animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.