दिवाळीनिमित्त पोह्यांना वाढली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 02:32 AM2018-11-04T02:32:26+5:302018-11-04T02:32:46+5:30
दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी - दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
डहाणू येथील खादी ग्रामोद्योगात प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८१ साली फोर्ट येथे राहणारे दिवंगत रामचंद्र जोशी यांनी घराच्या आवारातच पोहा मिल सुरू केली. त्यांंचा हा वारसा मिथुन जोशी हा युवक चालवत आहे. येथे दगडी आणि पातळ पोहे बनविले जातात. याकरिता गुजरी जातीच्या भाताची आवश्यकता असते. दगडी पोह्यांकरिता हे भात गरम पाण्यात तीन तास भिजविण्यात येते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते भाजले जाते. त्यापासून थोडेसे गोलसर आकारातील आणि जाड पोहे मिळतात.
या पोह्यांना चिवडा बनविण्यासाठी मुंबई बाजारात मोठी मागणी आहे. विशेषत: लालबागच्या प्रसिद्ध चिवडा गल्ली मध्ये मिळणारा विजयलक्ष्मी चिवडा, टेस्टी चिवडा आणि महालक्ष्मी चिवडा बनविण्यासाठी येथूनच निर्यात होते. तर पातळ (पेपर) पोह्यांसाठी भात थंड पाण्यात भिजवले जात असून वर उल्लेख केल्या प्रमाणेच प्रक्रि या केली जाते. त्यालाही चांगली मागणी आहे.
गुजरी भातापासून हे पोहे केले जातात. पूर्वी डहाणू तालुक्यातील डोंगरीपट्ट्यातून स्थानिक आदिवासींकडून या जातीचे भात मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचे. मात्र हल्ली हायब्रीड बियाण्यांचा प्रभाव शेतकºयांवर जास्त आहे. तरीही चारोटीनजीकच्या उरसा गावातून काही प्रमाणात ही निकड भरून निघते. तर अधिकच्या भातासाठी गुजरातच्या नवसारी येथून आयात केली जाते. ते घाऊक बाजारात १३ ते १५ रु पये प्रतिकिलो दराने खरेदी केले जाते. तर तयार पोहे ३० ते ३५ रूपये किलोने विक्र ी केले जातात असे मिथून सांगतो.
दरम्यान, भाताच्या दर्जानुसार त्यापासून किती पोहे मिळतात ते ठरते. असं असलं तरीही उत्तम दर्जाच्या शंभर किलो भातापासून ७० किलो दगडी पोहे, तर ५० किलो पातळ पोहे तयार होतात.
उर्विरत ३० किलो कनी (बारीक तुकडे) आणि कोंड्याच्या स्वरूपात मिळतो. त्याचा वापर जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो. त्याला ६ ते ८ रु पये प्रतिकिलोने बाजारभाव मिळतो. तर भाताच्या आवरणापासून निघणारा तूस हा गिरणीची भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणला जातो.
हक्काची बाजारपेठ हवी\
गट शेतीच्या माध्यमातून गुजरी या भाताची लागवड करण्यास कृषी विभागाने शेतकर्यांना प्रवृत्त केले पाहिजे. शिवाय त्यांना हमी भाव देऊन, या भाताची खरेदी केली पाहिजे. तर पोह्यांपासून प्रक्रि या उद्योगाला चालना देण्यासाठी महिला वर्गाला प्रशिक्षण देणे आवश्यक असून बाजारपेठ मिळवून द्यायला हवी. याचा समावेश विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात केल्यास त्यांना पौष्टिक अन्न आण िदुष्काळ परिस्थितीत जनावरांना खाद्याची गरजही भागविता येईल.
गुजरी भाताची कमतरता आणि सणवार वगळता वर्षभर हा व्यवसाय चालविणे अवघड आहे. त्यामुळे मोजक्याच पोहा मिल शेवटची घटका मोजत आहेत. याला नवसंजीवनीची गरज आहे.
- मिथुन जोशी, डहाणू फोर्ट येथील अरु ण पोहा मिलचा मालक