वाढवण : मुख्यमंत्र्यांनी केली निराशा

By admin | Published: February 9, 2016 02:22 AM2016-02-09T02:22:22+5:302016-02-09T02:22:22+5:30

वाढवणच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मच्छीमार बंधूना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे गुळमुळीत

Increasingly: Chief Minister expressed disappointment | वाढवण : मुख्यमंत्र्यांनी केली निराशा

वाढवण : मुख्यमंत्र्यांनी केली निराशा

Next

पालघर : वाढवणच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मच्छीमार बंधूना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे गुळमुळीत विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे वाढवण बंदर रद्द केल्याची घोषणा बहुदा ते करतील, अशी अपेक्षा असलेल्या पालघर जिल्हावासियांची आज साफ निराशा झाली. तसेच ठाणे जिल्हा बँकेचे विभाजन करून नवी पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापने बाबतही त्यांनी घोषणा न केल्याने या नाराजीत अधिकच भर पडली. हो आम्हाला विकास हवा आहे. तो करतानाही आम्हाला सर्वसामान्यांना भागीदार करून घ्यायचे आहे, असे उद्गार त्यांनी काढून बंदराच्या उभारणीबाबतचे संकेतच दिले.
आज पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-रिपाईयुतीचे उमेदवार अमीत घोडा यांच्या प्रचारसभा आज पालघरमध्ये पार पडली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, अमीत घोडा, खा. चितामण वनगा, खा. अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई, खा. कपील पाटील, उपनेते अनंत तरे, आ. निलम गोऱ्हे, आ. पास्कल धनारे, केतन पाटील, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे इ. मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्याची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणुन सर्व सोयीयुक्त असे सर्वात चांगले मुख्यालय उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पर्ससीन या विनाशकारी मासेमारी पद्धतीमुळे दहा वर्षात मत्स्यबिजे नष्ट होत आहेत.
मत्स्य उत्पादन घटत आहे. त्यामुळे पर्ससीन बंदीचा प्रस्ताव काँग्रेसच्या सरकारने दडवून ठेवला होता. आमच्या सरकारने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणले व परवान्यावर बंदी आणली. सहकारी बर्फ कारखान्याना १२.५० रू. युनीटने मिळणारी विज आम्ही कमी करून ६ रू. नी दिली, आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून टाटाशी करार करून अद्ययावत किचन निर्मिती केली, आश्रमशाळा मधील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळामध्ये प्रवेश मिळवून दिला. पालघरमधील समुद्रकिनारे कारखान्यामधील रासायनिक प्रदुषीत पाण्याने प्रदुषीत झाल्याच्या तक्रारी असल्याने रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी निधी देताना स्थानिकांना नोकरी मिळवून देण्यासाठी डोळ्यात तेल घालून पाहणी करू असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी पालघरमधील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण अमीत घोडा यांना निवडून द्या असेही आवाहन त्यानी यावेळी केले.


आदिवासींसाठी ५० हजार घरे
एकही नागरीक घराशिवाय राहु नये यासाठी सर्व दलीत आदिवासींना घरे देण्यासाठी ५० हजार घरांचे उद्दीष्टे ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र ते कधी पूर्ण होईल, ही घरे कोण साकारणार याबद्दल त्यांनी मौन पाळले.

तेही लवकरच आत जातील
१५ वर्षात महाराष्ट्रात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी महाराष्ट्राला लुबाडण्यापलीकडे काहीच केले नाही. आता एकेकांच्या संपत्तीचा खुलासा होतोय ते पाहता थक्क करणारी संपत्ती आहे. काही आता जेलमध्ये आहेत काही बाहेर आहेत तेही लवकरच आत जाणार आहेत.

पैसा देशाच्या तिजोरीत परत आणू
आमचा कुणाबद्दल आकस नाही पण एक निश्चित केलेय ज्यांनी ज्यांनी या देशाला लुटले त्यांच्या तिजोरीतील पैसा जनतेच्या तिजोरीत परत गेलाच पाहिजे असे सांगून त्यांनी कुणाचेही नाव न घेता आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली.

Web Title: Increasingly: Chief Minister expressed disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.