यंदा मकरसंक्रांतीवर महागाईचे सावट; सुगड, तीळगूळ महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:27 PM2020-01-11T23:27:23+5:302020-01-11T23:27:47+5:30

मजुरी, साहित्य, मेहनत, वेळ आदींचा परिणाम

Inflation slows down on Capricorn this year; Sweet, sesame seeds expensive | यंदा मकरसंक्रांतीवर महागाईचे सावट; सुगड, तीळगूळ महागले

यंदा मकरसंक्रांतीवर महागाईचे सावट; सुगड, तीळगूळ महागले

googlenewsNext

राहुल वाडेकर

विक्र मगड : मकर संक्रांत अवघ्या तीन दिवसांवर आल्याने वेगवेगळ्या आकारांची सुगडे ग्रामीण भागासह विक्रमगडच्या बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरलेले आहे. सर्व महिला आपल्या सौभाग्याचे रक्षण आणि मनातील दुरावा दूर करण्यासाठी संक्रांतीला एकमेकांना हळदी कुंकवाचे वाण देतात, मात्र महिलांच्या या वाणांवरही महागाईचे सावट पसरले आहे.

संक्रांतीसाठी सुगड आवश्यक असतात. सुगड पुजण्याची प्रथा परंपरेनुसार आजही विक्र मगड परिसरात त्याच श्रद्धेने निभावली जात आहे. परंतु नेहमीच्या माहागाईमध्ये सुगड महाग झाली आहेत. लहान आकाराची सुगड ४० ते ५० रुपयांना पाच तर मोठ्या आकाराची सुगड ७० ते ८० रुपयांना पाच नग या भावाने विक्रमगडच्या बाजारात विकायला आली आहेत.

दिवसेंदिवस महाग होत चाललेली माती, ते बनविण्याची मजुरी, साहित्य, मेहनत, वेळ आदीचा परिणाम सुगडांवरही झालेला दिसत आहे. संक्रांतीचे सगळ्यात मोठे आकर्षण असले तरी महिलांचे मात्र सुगडाचे वाण देण्याची प्रथाही आपल्याकडे आहे. हुरडा, बोर, गाजर, शेंगदाणे, एखादे फळ, ऊस आणि तीळगूळ सुगडात ठेवून ते महिला एकमेकींना देतात. त्यामुळे बाजारात सध्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे.

सुगड व त्यातील साहित्याप्रमणेच महिलांची गर्दी तीळ आणि गूळ खरेदीकरिता दिसून येत आहे. बाजारात गेल्या वर्षी १६० रुपये किलो तिळाची (पॉलीसचे तीळ) किंमत होती, ती यंदा १८० वर गेली आहे. तर चिकीच्या गुळाची किंमत ५५ रुपये किलो होती, यंदा मात्र या गुळाची किंमत ७० ते ८० रुपये झाल्याचे विक्रमगड येथील दुकानदार व्यापारी विकास आळशी यांनी सांगितले.

वस्तू मिळणे अवघड
मकर संक्र ांत ही दरवर्षी १४ जानेवारीलाच येते, मात्र यंदा ती १५ जानेवारीला म्हणजेच एक दिवस पुढे हा सण गेला आहे. सध्या जानेवारीमध्येही थंडीची लाट असल्याने याचा परिणाम होऊन शेतातील गहू, हरभऱ्याची पिके अजूनही तितक्या प्रमाणात भरलेली दिसत नाहीत. एक वेळ ऊस मिळले, पण बोर, हरभºयाची डहाळे कुठून आणणार, त्यामुळे संक्रांतीला या वस्तू मिळणे अवघड झाले असल्याचे काही महिलांनी सांगितले.

Web Title: Inflation slows down on Capricorn this year; Sweet, sesame seeds expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.