पांढऱ्या अळीचा भात पिकावर झाला प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:43 PM2019-09-25T23:43:54+5:302019-09-25T23:44:02+5:30
वाडा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; संततधार पावसामुळे झाले नुकसान
वाडा : वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. या वर्षी भात पीकसुद्धा चांगले आले होते. मात्र पावसाच्या संततधारेमुळे उशीरा लागवड केलेल्या भातावर मोठ्या प्रमाणावर पांढºया आळीने (बगळ्या रोग) आक्र मण केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
वाडा तालुक्यात बहुतांशी शेतकरी भात या एकमेव पिकावर आपला वर्षभराचा संसारगाडा चालवीत असतात. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उशीराने लागवड केलेली भात रोपे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने कुजून गेली. तर काही भात रोपांवर पांढºया आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
हा रोग आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारची औषधांची फवारणीही केली. मात्र त्याचा फार फायदा झाला नाही. या रोगाने वाडा तालुक्यातील मौजे पीक येथील सचिन पंढरीनाथ पाटील, नारायण परशुराम पाटील या शेतकºयांचे, भात पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतकºयांना भरपाई कधी मिळणार?
दरम्यान, महिन्याभरापूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या भात पीकाचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र हे पंचनामे होऊन महिना झाला तरी अद्याप शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही नुकसान भरपाई मिळेल की नाही या विवंचनेत असलेले शेतकरी आता या पांढºया आळीने केलेल्या आक्र मणाने हवालदिल झाला आहे.