पालघरमधील गांधीनगरातून ८० हजारांचा गांजा जप्त, बोईसर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:01 AM2018-04-20T00:01:11+5:302018-04-20T00:01:11+5:30
येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आहे.
पालघर : येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आहे.
गांधीनगर झोपडपट्टी ही बेकायदेशीर कृत्यासाठी प्रसिद्ध असून या परिसरातून सहजरित्या गांजा व अमली पदार्थ मिळत असल्याचे या पूर्वीही आढळून आले आहे. या भागातून गांजा विकत घेऊन त्याची विक्र ी किनारपट्टीवरील गावासह अन्य गावात केली जात आहे.
नुकतीच नवापूर गावात गांजा विक्र ी करणाºया एका इसमास स्थानिकांनी पकडून त्याची धुलाई करीत पोलीसांच्या हवाली केले होते. गांधीनगर झोपडपट्टीत अनेक बेकायदेशीर व्यवहार होत असताना पालघर पोलिसांकडून मात्र ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. तर पालघरमधील काही सुशिक्षित तरु णही औद्योगिक वसाहती मधील बंद अवस्थेतील कारखाने भाड्याने घेऊन अमलीपदार्थ बनवून तात्काळ गर्भ श्रीमंत बनण्याच्या कारस्थानाचे बळी पडत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटच्या अधिकाºयांना एक इसम बुधवारी गांजा विक्र ी करण्यास गांधी नगर झोपडपट्टीजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर प्रभारी अधिकारी के एस हेगाजे, स.पा.ेनि. एम. चाळके, प्रताप दराडे, भरत पाटील, दीपक राऊत, एन जनाठे यांच्या पथकाने गुजरात राज्यातून आलेल्या आरोपीस ताब्यात घेऊन त्याला अटक केली. गुजरात मार्गे महाराष्ट्रामध्ये येणारी दमण बनावटीची दारु सुद्धा या निमित्ताने चर्चेमध्ये असून कारवाईची मागणी होत आहे.