दमदाटी करणाऱ्या कॉन्स्टेबलची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:07 AM2018-09-01T03:07:21+5:302018-09-01T03:07:38+5:30
या धंद्यात सक्रिय असणाºयांना कॉन्स्टेबल सोमवंशी यांचा वरदहस्त असल्याचे पुरावे एका हिंदी वृत्तवाहिनीचा पालघर जिल्हा प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्या हाती लागले.
बोर्डी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाचे कॉन्स्टेबल देविदास सोमवंशी यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याची तक्रार पत्रकार योगेश चांदेकर यांनी डहाणू पोलीसात दाखल केली आहे. दमण बनावटीची अवैध दारू डहाणू आणि तलासरी या भागातून महाराष्ट्र्रात आयात केली जाते.
या धंद्यात सक्रिय असणाºयांना कॉन्स्टेबल सोमवंशी यांचा वरदहस्त असल्याचे पुरावे एका हिंदी वृत्तवाहिनीचा पालघर जिल्हा प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्या हाती लागले. त्यांनी या बाबत सोमवंशी यांना विचारले असता, त्यांनी शिवीगाळ तसेच दमदाटी केली. तथापि सोमवंशी विरु द्ध पत्रकाराने डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय या अवैध धंद्यात कॉन्स्टेबलचा हात असल्याचे पुरावे उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर कार्यालयाच्या अधीक्षकांना सादर केले आहेत. शिवाय, या कर्मचाºयाविरु द्ध कठोर कारवाई करावी, तसे झाल्यास दमण दारू तस्करीच्या धंद्याला आळा बसण्यास मदत होईल, अशी मागणी केल्याचे चांदेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकारावर धाकदपटशाही करणाºया या कॉन्स्टेबल विरु द्ध निषेध नोंदवून, कायदेशीर कारवाईची मागणी जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी केली आहे.
तीन दिवसांत अहवाल
या बाबत उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर यांचे मार्फत चौकशीचे आदेश देऊन तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. अशी माहिती पालघर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल बुकन यांनी दिले आहे.