जिल्हाधिकाऱ्यांकडून डहाणूतील रुग्णालयांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:20 PM2019-07-21T23:20:23+5:302019-07-21T23:20:43+5:30
आरोग्य सुविधांचा घेतला आढावा : कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
डहाणू : पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी डहाणू तालुक्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी आणि डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक शनिवारी भेट दिली.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेताना शिंदे यांनी डहाणू तालुक्यातील दवाखान्याला भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंचणी येथे सुमारे दीड तास त्यांनी सुविधांचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने तेथील कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा कॉटेज हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाºया डहाणू उपजिल्हा रु ग्णालयाकडे वळवला. तेथील स्त्री रोग कक्ष, प्रसूती गृह, कुपोषित बालक उपचार कक्ष, सामान्य रु ग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रु ग्णालयातील पदाधिकारी तसेच कर्मचाºयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक असून वावर वांगणीतील कुपोषित बालमृत्यूने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, पालघर, विक्रमगड, वाडा या तालुक्यातही कुपोषणाने डोके वर केले आहे. शासनाच्या वतीने विविध योजना आखून कुपोषण मुक्तीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजूनही कुपोषण शून्य झालेले नाही. डॉ शिंदे यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केल्याने कुपोषण मुक्त जिल्हा निर्माण होण्याचे शुभ संकेत दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यातील रुग्णांना उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अनेकांना गुजरात व सेलवासला पाठविण्यात येते. याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कांचन वानेरे, कॉटेज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी डी हेंगणे, डहाणू नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ विजयकुमार द्वासे, उपजिल्हा रु ग्णालयाचे डॉ प्रभाकर भोये, कार्यालय अधीक्षक संतोष जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.