काळाचा घाला : पाणी भरण्यास जात होता, वीजवाहिनीचा शॉक लागून युवक मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:40 AM2017-10-12T01:40:32+5:302017-10-12T01:40:46+5:30
पाणी भरण्यासाठी सायकल वरून जात असलेल्या विलास किसन वरखंडे या ३६ वर्षीय युवकाचा लोंबकळणाºया वीज वाहिनीचा शॉक बसून बुधवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला.
बोर्डी : पाणी भरण्यासाठी सायकल वरून जात असलेल्या विलास किसन वरखंडे या ३६ वर्षीय युवकाचा लोंबकळणाºया वीज वाहिनीचा शॉक बसून बुधवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. महावितरणच्या कोसबाड वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता विकास संपत कणसे, वरिष्ठ तंत्रज्ञ रमेश आर. पटेल यांंच्या विरोधात घोलवड पोलिसात तक्र ार दाखल केली आहे.
विलास वडापावचा स्टॉल चालवून पत्नी, आई आणि दोन लहान मुलीचा उदरिनर्वाह चालवायचा. या घटनेमुळे त्याचा संसार उघड्यावर पडला आहे. वीज कर्मचाºयांच्या निष्काळजीमुळे त्याचा बळी गेल्याचा आरोप करून कुटुंबियांनी २० सप्टेंबर रोजी लोंबकळणाºया तारेच्या संपर्कात येऊन याच गावातील १३ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात वाचला होता. दरम्यान घोलवड ग्रामपंचायतीअंतर्गत कोलपाडा या आदिवासी वस्तीला नियमित नळाद्वारे पाणी येत नाही. तथापि पायपीट करून २ किमी वरील गावाबाहेरच्या कुपनलिकेवर जावे लागते. करोडो रुपये खर्चून गावात राबविलेल्या जलस्वराज्य योजनेचा आदिवासींना फायदा काय? पेसा निधीचा वापर नेमका कुठे होतो? ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्यतेमुळेच पाण्यासाठी बळी गेल्याचा आरोप केला जातो आहे.