निर्जन वा अंधार असलेल्या २७७ ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही, वीज दिवे बसवण्याच्या  महापालिकांना सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 03:16 PM2023-06-10T15:16:46+5:302023-06-10T15:16:54+5:30

शहरातील निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी महिला - मुलींच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पोलिसांनी मीरा भाईंदर शहरात अश्या १९६ तर वसई विरार शहरात ८१ ठिकाणांची यादी बनवली आहे . 

Instructions to municipalities to install CCTV, electric lights along with security guards for the safety of women in 277 secluded or dark places. | निर्जन वा अंधार असलेल्या २७७ ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही, वीज दिवे बसवण्याच्या  महापालिकांना सूचना 

निर्जन वा अंधार असलेल्या २७७ ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही, वीज दिवे बसवण्याच्या  महापालिकांना सूचना 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांनी महिला सुरक्षितता समितीच्या बैठकीत मीरा भाईंदर व वसई व्रत महापालिकांना महिला सुरक्षिततेसाठी २७७ निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे , सीसीटीव्ही व वीज दिवे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत . मीरा भाईंदर महापालिकेने वीज दिवे बसवण्याची तयारी दर्शवली असली तरी सुरक्षा रक्षक नेमण्यास व सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलेला नाही . 

शहरातील निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी महिला - मुलींच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पोलिसांनी मीरा भाईंदर शहरात अश्या १९६ तर वसई विरार शहरात ८१ ठिकाणांची यादी बनवली आहे .  निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी  महिला - मुलीं सोबत गैरप्रकार होण्याची भीती असते . शिवाय गर्दुल्ले - मद्यपी, व्यसनी आदी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा वाढता वावर महिला - मुलींच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचा ठरू शकतो . उनाडटप्पू व रोडरोमियोंचा धोका असतो . 

महिला सुरक्षितता समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी महिला सुरक्षेचा आढावा घेतला . बैठकीत निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे , सीसीटीव्ही व वीजदिवे महापालिकांना बसवण्याच्या सूचना पांडेय यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांना केल्या .   वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस मध्ये सीसीटीव्ही बसवण्यास पोलिसांनी सांगितले आहे . 

सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास पालिकांना सांगितले असून मीरा भाईंदर महापालिकेने पोलिस आयुक्तांच्या निर्देशा नुसार पोलिसांनी दिलेल्या ठिकाणी वीजदिवे बसवण्याची कार्यवाही सुरु केल्याचे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले . सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून सीसीटीव्ही साठी पालिके कडे निधी नसल्याने आमदारांच्या मदतीने शासना कडून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न पोलीस व पालिका करणार असल्याचे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले . 

वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले कि , महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निर्देशक नुसार आम्ही महावितरण ला पोलिसांनी दिलेल्या ठिकाणांवर वीजदिवे बसवण्यास कळवले आहे .  समुद्र किनारे किल्ले तसेच अन्य निर्जन ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची कार्यवाही सुरु आहे . शहरात सीसीटीव्ही बसवले जात असल्याचे मुठे म्हणाले . 

Web Title: Instructions to municipalities to install CCTV, electric lights along with security guards for the safety of women in 277 secluded or dark places.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.