विमा कंपनीनेही फिरविली पाठ , बळीराजा मेटाकुटीला : पावसाने केली अवकृपा, पंचनामे करणारी महसूल यंत्रणा संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:30 AM2017-10-13T01:30:45+5:302017-10-13T01:31:15+5:30
या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला
वसंत भोईर
वाडा : या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे तसेच सध्या सतत पडत असणाºया पावसाने राहिलेले भातपीकसुद्धा वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरीप हंगाम २०१७ साठी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार हेक्टरी ७८० रुपये दराने भात पिकाचा विमा उतरविण्यात आला आहे त्यासाठी विमा संरक्षण रक्कम ३९ हजार रुपये प्रति हेक्टर एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या या विम्याची जबाबदारी नॅशनल इन्शुअरन्स वर सोपवली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकºयांना ही रक्कम भरपाई म्हणून कंपनी देणार होती. हजारो शेतकºयांनी हा पीकविमा काढला आहे ज्यांनी पीककर्ज घेतले त्यांच्या कर्जातूनच वजा करण्यात आला होता. मात्र असे असूनसुद्धा आता मात्र ह्या विमा कंपन्यांने नैसर्गिक आपत्तीने आणि रोगाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेची फेड करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरून महिना झाला त्याचा दमडा अजून मिळालेला नाही. हातातले पीक गेलेले आणि हप्ता घेऊनही विमा कंपनी भरपाईबद्दल शब्द उच्चारत नाही. अशा त्रांगड्यात बळीराजा सापडला आहे.