दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आरोपीसह अंतरराज्यीय टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:56 PM2024-01-11T15:56:34+5:302024-01-11T15:56:59+5:30
Nalasopara Crime News: टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात इनामी व फरारी आरोपीसह अंतरराज्यीय टोळी गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
-मंगेश कराळे
नालासोपारा - टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात इनामी व फरारी आरोपीसह अंतरराज्यीय टोळी गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड फाटा येथील पेट्रोल पंपावर ५ जानेवारीला रात्री सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मनिष ऊर्फ राजु चव्हाण, भाऊसाहेब गवळी, रविंद्रसिंग सोलंकी, सुखचेन पोवार, माँटी चौहान आणि महिला आश्विनी चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हेलीपॅडच्या बाजूला असलेल्या मैदानातून सहाही आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींना पोलीस हे स्वतःची ओळख सांगून ताब्यात घेत असताना, आरोपीत यांनी पळून जाण्याच्या उद्देशाने पोलीस पथकावर हल्ला करून दुखापत केली आहे. आरोपींच्या कब्जातुन तपासा दरम्यान स्कॉर्पिओ जिप, रिक्षा, लोखंडी कोयता, लोखंडी सुरा, बॅट-या, नायलॉनची दोरी, दोन लोखंडी कटावण्या, मिरची पूड, मोबाईल फोन व रोख रक्कम, दागिने असा एकूण १० लाख १६ हजार ३७६ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तसेच सदर गुन्हयाचे तपासादरम्यान अर्नाळा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपीचे इतर साथीदार आरोपी आकाश पवार, गोपाल पवार, मोहन काले, उमेश पवार, अनिता पवार यांना तसेच गुन्हयातील सोने विकत घेणारे ज्वेलर्स राजेंद्र सोनी यांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. सर्व आरोपींचे गुन्हेगारी कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, तसेच मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश असे असून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
उपरोक्त कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागउत, रंजना शिरगीरे, पोलीस हवालदार अशोक पाटील, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाल, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे,चेतन निवाळकर, दत्ता जाधव, आनंद राठोड, विजया मँगेरी, संतोष चव्हाण यांनी केली आहे.