समुद्रातील ‘घुसखोर मच्छीमार भगाव’ मोहीम, अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षे धगधगतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:44 AM2020-01-11T00:44:04+5:302020-01-11T00:44:08+5:30
पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे.
पालघर : पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे. या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना आखण्यात केंद्र तसेच राज्य शासनाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. राज्य शासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने मुंबई मधील मढ-भाटी भागातील शेकडो मच्छीमार बोटींनीही आमच्या भागात आपल्या कवी मारण्यास घेतल्याने मासेमारी करण्यास जिल्ह्यातील मच्छीमाराना क्षेत्रच उरलेले नसल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत आपले म्हणणे मांडण्यासाठी संरक्षण समिती अध्यक्ष अशोक आंभिरे, मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर, जयप्रकाश मेहेर, सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील, सुभाष तामोरे आदींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.
आमच्या समोरील क्षेत्रातील वाढत्या कवींच्या क्षेत्रामुळे आम्हाला मासेमारी करणे शक्य होत नसल्याने आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ जानेवारी रोजी दातीवरे ते झाई दरम्यानचे सर्व मच्छीमार आपला व्यवसाय सोडून समुद्रात बोटी घेऊन जात अतिक्रमण करणाऱ्या घुसखोरांविरोधात ‘भगाव मोहीम’ राबवणार आहेत.
>सोमवारी होणार बैठक
मढ आणि भाटीमधील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार,
१३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आंभिरे यांनी दिली.