आश्रमशाळेच्या दांडीबाज मुख्याध्यापकाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:11 AM2018-08-06T02:11:17+5:302018-08-06T02:11:23+5:30
जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चास आश्रम शाळेतील दांडी बहादूर मुख्यधापक साहेबराव आहिरे याच्या मनमानी कारभाराची जव्हार प्रकल्प कार्यालयानकडून चौकशी सुरू असल्याची माहिती अजित कुंभार यांनी लोकमतला दिली
- रविंद्र साळवे।
मोखाडा : जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चास आश्रम शाळेतील दांडी बहादूर मुख्यधापक साहेबराव आहिरे याच्या मनमानी कारभाराची जव्हार प्रकल्प कार्यालयानकडून चौकशी सुरू असल्याची माहिती अजित कुंभार यांनी लोकमतला दिली
मुख्यधापकाने निवासी रहाणे बंधनकारक आहे परंतु आहिरे हे नेहमीच गैरहजर असतात शनिवारी सुट्टी घेतल्या नंतर ते दुसऱ्या हप्त्यात मंगळवारी उगवतात ही बाब नित्याचीच झाली होती.
दहावीच्या वर्गात ६१ मुले शिकत असून त्यांचे इंग्लिशचे शिक्षक मुख्यधापक असूनही ते तो शिकवत नाही त्यामुळे येथे शिकणाºया ३१२ विद्यार्थ्यांसह पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे .
या बाबत दैनिक लोकमतच्या २ आॅगस्ट च्या अंकात ‘मुख्यधापकांच्या गैरहजेरीने संताप ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच त्याचे पितळ उघडे पडले आहे आपली लंगडी बाजू सावरण्यासाठी लंपास केलेल्या ४४ हजाराच्या २ संगणकांपैकी एक भंगार कम्प्युटर विरार येथून आणून ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच चौकशी सुरू असतांना देखील आहिरे हे नाशिक येथे अधून- मधून मुक्कामी थांबत असून वृत्तपत्रात बातमी आल्यामुळे मुलांसह शिक्षकांनाही हा मुख्यधापक धमकावत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे यामुळे अश्या बेजबाबदार मुख्यधापका वर चौकशीअंती काय कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.