नालासोपाऱ्यात गुंतवणूकदारांना चुना ; लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:16 AM2018-07-29T03:16:55+5:302018-07-29T03:17:04+5:30
लोकसंख्या वाढीमुळे अनेक वेळी पैसे कमवण्यासाठी लोक गैरमार्ग स्विकारत असतात. नालासोपारा पूर्वेला देखील गृह प्रकल्पात गुंतवणूकदारांना स्वस्त दराची आमिष दाखवून आरोपी अरु ण रामचंद्र याने लोकांना लाखो रु पयांना लुबाडले असल्याची घटना समोर आली आहे.
विरार : लोकसंख्या वाढीमुळे अनेक वेळी पैसे कमवण्यासाठी लोक गैरमार्ग स्विकारत असतात. नालासोपारा पूर्वेला देखील गृह प्रकल्पात गुंतवणूकदारांना स्वस्त दराची आमिष दाखवून आरोपी अरु ण रामचंद्र याने लोकांना लाखो रु पयांना लुबाडले असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
अरु ण रामचंद्र यांनी साई क्षितीज अपार्टमेंट, तेजल अपार्टमेंट अशा आचोळे तलावाच्या बाजूला गृहप्रकल्प विकसित केला. यात विशाखा अशोक जाधव (६३) या नालारोपाºयात विजय नगर येथे वास्तव्यास आहेत. यांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली त्याचबरोबर या प्रकल्पात मुंबई, वसई, नालासोपारा अशा ठिकाणी राहणाºया अनेकांनी देखील या प्रकल्पात आपल्या जन्मभराची कमाई गुंतवली होती. मात्र, अरु ण रामचंद्र यांनी या गुंतवणूकदारांच्या ठेवीची लुट करुन लबाडीच्या इराद्याने आर्थिक फसवणूक केली आहे. तुळींज पोलिसांनी आरोपिवर कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. तर ह्या प्रकल्पात जर अजून कोणत्या अन्य व्यक्तिंची फसवणूक झाली असेल तर तुळींज पोलीस ठाण्यात त्यांनी आपले सर्व दस्तावेज घेऊन हजर राहवे असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. तर अशी गुंतवणूक करताना सारासार विचार करून गुंतवणूक करा अशी विनंती देखील पोलिसांनी नागरिकांना केली आहे.