रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लोखंडचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:21 PM2020-02-12T23:21:37+5:302020-02-12T23:21:43+5:30

ट्रेलरचे अपहरण : तब्बल १६ टन लोखंड लांबवले

Iron ore for fear of revolver | रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लोखंडचोरी

रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लोखंडचोरी

Next

वाडा : तालुक्यातील आबिटघर येथून मुंबईकडे लोखंड घेऊन चाललेल्या ट्रेलरला भिवंडी - वाडा महामार्गावर काही जणांनी ट्रेलर अडवला. चालक तसेच वाहकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत ट्रेलरचे अपहरण करून त्यातील १६ टन लोखंडाची चोरी केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.


तालुक्यातील आबिटघर येथे सूर्या ही लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. येथून नेहमी शेकडो टन लोखंडाची वाहतूक होत असते. सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास सूर्या कंपनीतून सुमारे २६ टन लोखंडी सळ्या घेऊन एक ट्रेलर मुंबईकडे रवाना झाला. वाडा - भिवंडी मार्गाने जात असताना सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास खुपरी नजीक ट्रेलर असता चोरट्यांनी ट्रेलरसमोर गाडी आडवी टाकून ट्रेलर थांबवला. गाडीतील तोंडाला रूमाल बांधलेल्या व्यक्तींनी ट्रेलर चालक दीपक शिवप्रसाद आणि वाहक अभिषेक सिंग यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून खाली उतरवले आणि त्यांनी आणलेल्या गाडीत डांबून ठेवले. त्यानंतर त्यांनी ट्रेलर घेऊन पोबारा केला.


या चोरट्यांनी चालक आणि वाहकाला रात्री उशीरा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिल्हार फाटा येथे सोडून दिले. तसेच ट्रेलरही वाडा - मनोर मार्गावरील कंचाड येथे टाकून पोबारा केला.
दरम्यानच्या काळात ट्रेलरमधील सुमारे १६ टन लोखंडी सळ्या लंपास असल्याचे निदर्शनास आले असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ७ लाख एवढी आहे. या प्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Iron ore for fear of revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.