सारसून गावातील मखर उत्सवाद्वारे ग्रामदेवतेला दिला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:39 AM2017-11-27T06:39:16+5:302017-11-27T06:39:20+5:30
तालुक्यातील सारसून गावात मखर (मुळूटी) उत्सव कार्यक्र म मोठ्या उत्साहात साजरा झाला. मखर उत्सव सारसून गावातील आदिवासींच्या पद्धतीने मखर मुळूट्या उत्सव साजरा जातो.
- हुसेन मेमन
जव्हार : तालुक्यातील सारसून गावात मखर (मुळूटी) उत्सव कार्यक्र म मोठ्या उत्साहात साजरा झाला. मखर उत्सव सारसून गावातील आदिवासींच्या पद्धतीने मखर मुळूट्या उत्सव साजरा जातो. या उत्सवासाठी सारसून गावातील आदिवासी नागरिकांनी गेल्या वर्ष भरापासून पाळद पाळून उत्सव साजरा करण्यात आला. हा मखर मुळूटीचा कार्यक्र म दोन दिवस चालला.
सारसून गावातील आदिवासी नागरिकांनी आदिवासींच्या पारंपारिक पद्धतीने मखर मुळूटी उत्सव साजरा करण्यासाठी येथील ग्रामस्थ महिनाभरापूर्वी कामाला लागले होते. गावाच्या वेशीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावण्यासाठी लाकडांमध्ये कोरीव काम करून देवतांच्या मृती घडविण्यात आले होते. या कार्यक्र मासाठी गावामध्ये ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून पाळद केली होती. तसेच या पाळद दरम्यान संपूर्ण गावात दारू बंदी, गावात भांडण वाद करायचे नाही. तसेच कोणतेही वाद्य वाजवायचे नाही. नवीन आलेलं पीक खायचे नाही. घरातील धान्य विकायचे नाही. कोंबडे, बकरे कापायचे नाही. अशी पाळद प्रथा करण्यात आली. आधुनिक काळातही ही प्रथेचा मान सर्वजण एकदिलाने स्विकारतात.
गावकºयांची अशी धारणा आहे की, मखर मुळूटी मुळे गावावर येणारी नैसिर्गक संकटे दूर होतात. पाळद केल्यामुळे आदिवासींना संकटांपासून संरक्षण मिळते. तसेच गावातील रोगराई, गुराढोरांवर येणारी संकटे आणि वर्षभरात येणारे पीक चांगले येतात. या कार्यक्र मासाठी संपूर्ण गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यासाठी रात्रभर गावाच्या वेशीवर जमून ग्रामस्थांनी घांगळ हे आदिवासींची वाद्य वाजवून आदिवासींच्या प्रथेनुसार देवदेवतांची पूजा, अर्चना करण्यात आली.
दुसºया दिवशी आदिवासींच्या प्रथेनुसार बळी द्यावा लागतो. त्याप्रमाणे मेंढे, बकरे आणि कोंबड्यांचा बळी दिला. देवाला मान दिल्यानंतर प्रसाद म्हणून सर्व ग्रामस्थांनी गावाच्या वशीवर सामुहिक जेवण केले. या कार्यक्र माचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्र माच्या दुसºया दिवशी गावामध्ये कोणाच्याही घरी चूल पेटवली जात नाही. आणि गावात कोणाच्याही घरी स्वयंपाक केला जात नाही. तसेच गावकºयांनी वेशीवर मखरांच्या समोरच जेवणावळ करावी अशी प्रथा आजही आदिवासींमध्ये आहे.
ग्रामस्थांच्या म्हणीनुसार, मखर मुळूटी हा कार्यक्र म दर ६ वर्षांनी साजरा होतो. अशी माहिती सारसून गावातील पोलीस पाटील मधू जंगली यांनी दिली. मखर उत्सव साजरा करण्यामागील मूळ उद्देश, महत्व व आदिवासी संस्कृती बद्दल माहिती गावातील माजी सरपंच सजन जंगली यांनी लोकमतला दिली.