पर्यावरण दिनापासून अनोखा उपक्रम वर्षभर राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:53 PM2019-06-05T22:53:44+5:302019-06-05T22:53:52+5:30
मंधाना इंडस्ट्रीज (जी.बी.ग्लोबल) लि. कंपनीचा निर्धार..: एक कामगार एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प
बोईसर : तारापूर एमआयडीसी मधील मंधाना इंडस्ट्रीज (जी.बी.ग्लोबल) लिमिटेड या उद्योगाच्या व्यवस्थापनाने जागतिक पर्यावरण दिनापासून एक कामगार एक झाड लावून ती सर्व झाडे जगविण्याचा संकल्प करून एक अनोखा उपक्रम वर्षभर राबवणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मंधाना इंडस्ट्रीज (जी.बी.ग्लोबल) लिमिटेड या उद्योगाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिना निमित्त तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका ते नवापूर रस्त्या दरम्यान सुमारे २०० वृक्षरोपण करून त्या सर्व वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा मंधाना इंडस्ट्रीजने घेतली आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, एमआयडीसी तारापूरचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत भगत तसेच जी.बी. ग्लोबल ग्रूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन कुलकर्णी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दीपक धुमाळ, वरिष्ठ अधिकारी बी. व्ही.व्यंकटरमणी, निलेश कुमार मोदी, प्रमोद नाम्बियार, भरत राऊत अशोक कुमार दास आणि कंपनीचे कंत्राटदार राजू राठोड व राजू जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.