बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

By धीरज परब | Published: July 3, 2024 07:49 PM2024-07-03T19:49:06+5:302024-07-03T19:49:55+5:30

विष्णू शर्मा ह्याने २९ फेब्रुवारी ते मे २०२४ दरम्यान तिचा वेळोवेळी विनयभंग केला.

Jail custody of Chartered Accountant in rape case | बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

मीरारोड - एका १९ वर्षीय तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग आणि बलात्कार केल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी अटक केलेल्या चार्टर्ड अकाउंटंट विष्णू शर्मा  ह्याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीडित १९ वर्षाच्या तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन विष्णू शर्मा ह्याने २९ फेब्रुवारी ते मे २०२४ दरम्यान तिचा वेळोवेळी विनयभंग केला. तसेच तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केला. अशा प्रकारची फिर्याद तरुणीने दिल्यावर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम सकुंडे यांनी आरोपी शर्मा ह्याला अटक केली. ह्या आधी शर्मा ह्याला ठाणे न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विष्णू शर्मा ह्याला जेल कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Jail custody of Chartered Accountant in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.