जम्मू-काश्मीरच्या भाजपा नेत्या हिना शाफी भट रविवारी वसईत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 07:22 PM2019-12-06T19:22:02+5:302019-12-06T19:22:11+5:30

जम्मू-काश्मीरच्या भाजपाच्या वरीष्ठ नेत्या हिना शाफी भट या उपस्थित राहणार असल्याचे भाजपा वसई रोड मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

Jammu and Kashmir BJP leader Hina Shafi Bhat on Sunday! | जम्मू-काश्मीरच्या भाजपा नेत्या हिना शाफी भट रविवारी वसईत!

जम्मू-काश्मीरच्या भाजपा नेत्या हिना शाफी भट रविवारी वसईत!

Next

- आशिष राणे

वसई - भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळ पुरस्कृत प्रतीक्षा ट्रस्ट आयोजित वर्धापनदिन 2019 व स्नेह संमेलन दरवर्षीप्रमाणे येत्या रविवार 8 डिसेंबर रोजी वसई (प.) येथील साईनगर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू-काश्मीरच्या भाजपाच्या वरीष्ठ नेत्या हिना शाफी भट या उपस्थित राहणार असल्याचे भाजपा वसई रोड मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

केंद्रात सत्ता असलेल्या भाजपा सरकारने जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य घटक, असा दर्जा देणारे कलम 370 व 35 ए हटवल्यानंतर आज जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला व जम्मू-काश्मीरच्या विधानभवनावर आज भारताचा झेंडा डौलाने फडकत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या हिना वसईत येऊन नेमकं भट काय बोलणार याची जोरदार चर्चा सध्या वसई तालुक्यात आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केरळमधील पंथलम पॅलेसचे राजा, केरळ सरकारचे निवृत्त उपसचिव शशिकुमार वर्मा, पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय उपाध्याय, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, मेघालय सरकारचे सल्लागार निवृत्त आयएएस अधिकारी सी. व्ही. आनंद बोस, बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान, प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, भाजपा नेत्या नेहा दुबे, नालासोपारा सरचिटणीस मनोज बारोट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमात मान्यवरांचे पुरस्कार व समाजासाठी योगदान तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार ही  करण्यात येणार आहेत. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती प्रतीक्षा ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजप वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी लोकमतला दिली.

Web Title: Jammu and Kashmir BJP leader Hina Shafi Bhat on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.