जनता दल सेक्युलर गावितांच्या पाठीशी
By admin | Published: February 7, 2016 12:44 AM2016-02-07T00:44:35+5:302016-02-07T00:44:35+5:30
पालघर विधानसभेची निवडणूक पालघरच्या विकासासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावणार असून लोकशाही मानणारा व सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष असलेल्या कांग्रेसच्या राजेंद्र
पालघर : पालघर विधानसभेची निवडणूक पालघरच्या विकासासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावणार असून लोकशाही मानणारा व सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष असलेल्या कांग्रेसच्या राजेंद्र गावित यांना जनता दलाने (सेक्युलर) पाठिंबा जाहीर केला आहे.
पालघरच्या निवडणुकीत एका बाजूला बविआ तर दूसऱ्या बाजूला समाजामध्ये दुफळी निर्माण करणारी युती आहे. या पार्श्वभूमीवर जनतादलाने लोकशाही मानणारा सर्व समभाव जपणारा पक्ष म्हणून गविताना पाठिंबा जाहीर करून त्यांनाच मतदान करावे, असे मतदारांना आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यावर अध्यक्ष अमृत अधिकारी, माजी आमदार नवनीतभाई शाहा, डॉ. दादा परुळेकर, सुभाष मोरे, प्रकाश लवेकर, विजय राउत, हरेश्वर निजप, मोहन कामत, विद्याधर ठाकुर, इ.नी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
राजेंद्र गावित हे २००९ च्या निवडणुकीत पालघर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले व त्यानी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये आदिवासी विकास, कामगार, फलोत्पादन आणि विशेष लाभ क्षेत्र या विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यानी पालघर परिसरातील शेतकरी, मच्छीमार, कामगार, व्यापारी, छोटे उद्योग धंदेवाले, महिला, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले. त्यांचा लोकसंपर्कही दंडगा आहे. त्यामुळे येथील सर्व सामान्य मतदाराला आपला खरा खुरा लोकांचा प्रतिनिधि मिळाल्याचे समाधान मिळाले होते. पालघर विधान सभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची कामे त्यांच्या आमदार व राज्यमंत्री कार्यकाळात झाली. पालघर जिल्ह्याच्या विभाजनाचा खूप काळ प्रलंबित पडलेला प्रश्न त्यानी मोठ्या हिमतीने सोडवला. पालघरच्या विकासाचा मार्ग मोकळा करुन दिला.
(वार्ताहर)