जव्हारमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:24 AM2017-11-19T04:24:56+5:302017-11-19T04:24:59+5:30
शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. नविन नियमानुसार नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असून, २०११ च्या जनगणनेनुसार नगर परिषदेच्या आठ प्रभागातून १७ उमेदवार मिळून एकुण १२ हजार ४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
यंदाची निवडणूक थोडी वेगळी असून सर्वच पक्षांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी मतदारराजाची मिन्नतवारी करावी लागणार आहे. त्यातूनच शहरामध्ये दिवाळीच्या काळामध्ये विविध पक्षांच्या व काही उमेदवारांच्यावतीने मतदारांना मेवा-मिठाईचे वाटप करण्यात आले होते. या निवडणूकीचे आरक्षण जुलै महिन्यातच निश्चित झाल्याने काही चतुर उमेदवारांनी किरकोळ विकासकामे करुन त्या-त्या प्रभागावर आपले वर्चस्व दाखवून पक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण केला आहे.
पक्षांचे नाराज कार्यकर्ते, पदाधिका-यांनी आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्याने दुसºया पक्षात प्रवेश केल्याच्या घटना घडल्या असून अजूनही काही उलथापालथी होण्याची शक्यता आहे. मागील निवडणूकीत राष्टÑवादीने १७ पैकी १४ उमेदवार विजयी करून एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र राजकीय सुंदोपसुदींमुळे त्यांच्या दहा नगरसेवकांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला होता. त्याला पक्षाने न्यायालयात आव्हान देऊन फुटीर नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यश मिळविले होते.
कटू आठवणी लक्षात
राष्टÑवादीशी द्रोह करणाºया पाच नगरसेवकांनी घरवापसी केल्यामुळे त्यांना पुनर्जीवन मिळले होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील या उलथापालथीमुळे विकासकामे रखडून बकाल स्थिती निर्माण झाली होती. तसेच मागील ६ महिन्यापूर्वी दहा नगरसेवकांपैकी पाच अपात्रांच्या प्रभागामध्ये फक्त ५ महिंन्यांसाठी निवडणूका होऊन जव्हार प्रतिष्ठानचे चार तर १ अपक्ष निवडून आले. याचा त्रास झाल्याने आता मतदार चांगल्या उमेदवारांच्या प्रतिक्षेत आहेत.