जव्हार अंदाजपत्रकात नवे कर नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:15 AM2018-02-22T00:15:44+5:302018-02-22T00:15:59+5:30

जव्हार नगर पालिकेचा २०१८-१९ चा १,८४,९१२ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले.

Jawhar does not make new budget | जव्हार अंदाजपत्रकात नवे कर नाहीत

जव्हार अंदाजपत्रकात नवे कर नाहीत

Next

हुसेन मेमन
जव्हार : जव्हार नगर पालिकेचा २०१८-१९ चा १,८४,९१२ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले.
स्थायी समिती गठित झालेली नसल्यामुळे हे अंदाजपत्रक थेट जनरल बॉडीपुढे मंजुरीसाठी सादर केले. त्यात १८ कोटी ३४ लाख २९ हजार ९१२ जमा व खर्च १८ कोटी ३२ लाख ४५ हजार अशा तरतूदी प्रस्तावीत केल्या आहेत. त्यात १ लाख ८४ हजार ९१२ रूपयांची शिल्लकी आहे. त्यात मालमत्ता करात कोणतही वाढ सुचविलेली नाही, तरतुदीनुसार किमान २२ % ते २७ % दराने मालमत्ता कराची आकारणी करावयाची असते. सध्या मालमत्ता कराची वार्षिक आकारणी झोनल भाडेतत्वावर २४ % या दराने केलेली आहे. तसेच एकत्रित करापोटी ७५ लाख, पाणीपट्टी करापोटी ४६ लाख, शैक्षणिक करापोटी २० लाख, वृक्ष करापोटी ३.२५ लाख व रोजगार हमी करापोटी ३.२५ लाख एवढी वसूली होणे अपेक्षित आहे.
नगर पालिका क्षेत्रांत सार्वजनीक चौक, एस.टी. स्टॅन्ड, आठवडे बाजार, सार्वजनीक रस्त्याच्या कडेला इत्यादी ठिकाणी आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू लोकांना छोटे-छोटे व्यवसाय करणेसाठी जागा, टपºया, गाळे, तसेच कार्यालयासाठी इमारती भाडे तत्वावर देण्यात आल्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच परिषदेचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच महिला व बालकल्याण निधीसाठी ५% प्रमाणे ७ लाख, मागसवर्गीय कल्याण निधीसाठी ५ % प्रमाणे ७ लाख आणि अपंग कल्याणकारी योजना निधी ३ % प्रमाणे ४ लाख याप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.
स्वच्छ महाराष्टÑ अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालयासाठी २८३ जणांना आर्थिक लाभ देण्यात आला असून आणखी २०० लाभार्थ्यांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच प्लॅस्टीक निर्मूलन इत्यादी कार्यक्रमाद्वारा स्वच्छ व सुंदर जव्हारसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच भविष्यामध्ये शून्य कचरा मोहिम राबविण्याचा नगर परिषदेचा मानस आहे.
१ सप्टेंबर २०१८ ला नगर परिषदेच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असून याकामी नगर परिषद स्थापना शताब्दी वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम करण्यासाठी ५ लाख रूपयांची अंदाज पत्रकात तरतूद आहे.
तसेच शिक्षण विभागाच्या वेगळ्या अंदाजपत्रकात १ कोटी ७९ लाख ५० हजार इतके शासकिय अनुदान व २ लाख ३५ हजार इतके नगर परिषदेचे अनुदान त्यात दर्शविण्यात आले आहे.
तसेच सभेमध्ये प्रथमच विरोधीपक्ष नेते यांनी अंदाजपत्रकावर पदसिध्द अधिकारी म्हणून उपनगराध्यक्षांची स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यावेळी उपनगराध्यक्षा पद्मा रजपूत यांनी मला अंधारात ठेऊन हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे असे सांगितले. तसेच नगरसेवक रहीम लुलानिया व रश्मीन मनियार यांनी अल्पसंख्याकासाठी नगर परिषदेला शासनाकडून १० लाखांचा निधी येत होता, मात्र सन २०१४ पासून भाजप-सेनेच्या सरकारने तो बंद केला असून त्याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग करतो असे सांगितले त्यानुसार राष्टÑवादीच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला.
शिवजयंती, दसरा व इतर सण साजरे करण्यासाठी नगर परिषद वेगळी तरतूद करते. मात्र ईद-ऐ-मिलाद करीता कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही, त्याकरीता ५० हजारांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी लुलानिया यांनी केली. तसेच मनियार यांनी इद-ऐ-मिलादमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात येते असेही सांगितले. मात्र त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.
नविन नळ-पाणी योजना लवकरात-लवकर पूर्ण करण्यात यावी ही मागणी लावून धरून विरोधी पक्ष नेते दिपक कांगणे व भाजपाचे एकमेव नगरसेवक कुणाल उदावंत यांनी सभा गाजवली, त्यावर नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी लवकरच त्याचा पाठपुरवा करू असे सांगितले. जयसागर धरणाची उंची वाढविण्याकरीता १ कोटी ६० लाखाची तरतूद पालकमंत्र्यांनी करून दिलेली असून तो निधी जिल्हाधिकाºयांकडे जमा आहे, मेरीकडून अहवाल आलेला असून लवकरच उंची वाढीचे काम सुरू करण्यात येईल असे मुख्याधिकारी विधाते यांनी सांगितले.
पाणी कोणाला नको आहे ! असे उदगार काढत कांगणे यांनी खडखड येथील पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर आमलांत आणावी अशी मागणी करून पाणी प्रश्न मांडला.
तसेच दिवाबत्ती देखभाल दुरूस्तीचा खर्च दरवर्षी पावसाळ्यात खूपच वाढतो त्यामुळे १ लाखाची वाढीव तरतूद त्यासाठी करावी अशी मागणी बांधकाम सभापती अमोल औसरकर यांनी केली.
 

Web Title: Jawhar does not make new budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.