जव्हार तालुक्याचे बीएसएनएल कार्यालय झाले भंगार
By admin | Published: December 25, 2016 12:15 AM2016-12-25T00:15:47+5:302016-12-25T00:15:47+5:30
येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे
- हुसेन मेमन, जव्हार
येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे काम करणे येथील कर्मचाऱ्यांचा मोठे जिकरीचे होत आहे. त्यात जव्हार येथील जे.टी.ओ.कडेच जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा पदभार असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रिक्तपदांचा आकडा जास्त असल्यामुळे कामे कूर्मगतीने होत आहेत.
एकविसाव्या शतकात डिजीटल यंत्रणा आल्या असून वायफाय (विनातार) पध्दतीने दूरसंचाराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, जव्हारमध्ये आजही २५ वर्षापूर्वीच्या यंत्रांना दुरूस्त करून कशीबशी चालविली जात आहे. येथील यु.पी.एस.च्या बॅटऱ्या पूर्णपणे निकाम्या झाल्यामुळे वीज गेल्यावर यंत्रणा बंद पडत असून परिणामी संपूर्ण सेवा कोलमडत आहे. कार्यालयात पहाणी केली असता बॅटऱ्यांना अन्य दोन बॅटऱ्या जोडून यू.पी.एस. दहा मिनिटे कसेबसे चालेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करूनही कुठलीच नविन यंत्रणा दिली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वरीष्ठ विभागात कुठलेही प्रकरण गेले तरी त्याबाबतचे उत्तर महिना दोन महिना झाल्याशिवाय येत नाही.
त्यानंतरच मिळतो नवीन फॉर्म
नव्याने टेलीफोन कनेक्शन हवे असेल तर पहिले त्या भागात लाईन उपलब्ध आहे की, नाही याचा शहानिशा केली जाते. त्या नंतरच नविन कनेक्शन फॉर्म स्वीकारला
जात आहे. गेल्या २५ वर्षापासून
म्हणजे कार्यालयाच्या जन्मापासून लावण्यात आलेल्या जिर्ण दूरसंचार यंत्राणांवरच काम सुरू आहे. जमिनी खालून गेलेल्या कॉपर केबलचा अक्षरश: चुरा झालेला असून ठिकठिकाणी जॉर्इंट मारून काम रेटले जात आहे.
कल्याण एक्स्चेंजद्वारे चालतो कारभार
जव्हारचे कार्यालय हे कल्याण एक्स्चेंजद्वारे चालविले जाते, त्यामुळे जव्हार ते कल्याण मध्ये कुठेही लाईन ब्रेक झाली की, जव्हारची यंत्रणा ठप्प होते.
ब्रॉडबॅन्ड सेवाही बंद पडल्यास तिला पूर्ववत होण्यासाठी तीन चार
दिवस लागतात. देयक मात्र पूर्ण महिन्याचे भरावे लागत असल्यामुळेही ग्राहकांत तीव्र नाराजी पसरली आहे.