जव्हारला होणार बोटींगची सुविधा आणि उद्यानात धावणार टॉय ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 10:55 PM2019-08-31T22:55:30+5:302019-08-31T22:55:45+5:30
शहर कचरामुक्त व स्टार रेटींग ३ ला मंजुरी । २.५० कोटी निधी मंजूर
हुसेन मेमन
जव्हार : नगर परिषदेची सर्वधारण सभा शनिवारी राजीव गांधी क्र ीडा संकुल, जव्हार येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. येथील सूर्यतलाव येथे पर्यटकांना बोटींग करण्यासाठी मान्यता देण्याचा विषय मांडण्यात आला त्याला सभेने मंजुरी दिली, तसेच सनसेट पॉइंट येथे लहान मुलांसाठी टॉय-ट्रेन ची उभारणी, तलाठी कार्यालया शेजारील गार्डन विकसीत करणे, जुन्या राजवाड्यामधील गणेश हॉलचे नूतनीकरण करणे, जुना राजवाडा ईमारत संर्वधन करण्यासाठी उपाययोजना करणे, जुना राजवाडा येथे आदिवासी सुष्टी उभारणेस ऐतीहासीक पद्धतीचा बांधकामासाठी विशेष प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करणे, हनुमान पॉँईट, सनसेट पॉंईंट, गांधी चौक, सिल्व्हास रोड नाका, सूर्यतलाव, राजीव गांधी क्र ीडा संकुल तसेच विजय स्तंभ इत्यादी ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणे अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली.
महाराष्टतील स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेत प्राविण्य मिळविलेल्या महानगरपालिका/ नगरपरिषद यांचा अभ्यास दौर करण्याकरीता इंदोर, शिरपूर, लोणावळा, माथेरान इत्यादी शहरांचा अभ्यास दौरा करण्याची सूचना नगरसेवकांनी केल्या, तसेच हागणदारी मुक्ती अंतर्गत विविध पर्यटन स्थळांना सुशोभिकरण करणे यात सनसेट पॉइंट येथे काही ठिकाणी सुशोभिकरण करण्याबाबात विरोधी पक्ष नेते दिपक कांगणे यांनी सूचना दिल्या, तसेच शहरात शौचालय दुरूस्ती करण्यात यावी याकरीता नगरसेवक स्वप्नील औसरकर यांनी सूचना केल्या.
सनसेट पॉँइट येथील डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरीत झाल्यानंतर तेथे बगीचा तयार करणे व उत्पन्नाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करणे यावर नगरसेवक दिपक कांगणे यांनी वेंगुर्ला येथे डंपींग ग्राऊड हटविल्यानंतर त्या जागेत धाबा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा भाडे तत्वावर देण्यात आली, जव्हारला ही असे करता येईल असे सुचिवले.
स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत जव्हार शहर कचरामुक्त व शहर स्टार रेटींग क्रमांक ३ घोषीत करण्याबाबत निर्णय घ्यावा असा विषय मांडण्यात आला यावर मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी शासनाने २.५० कोटी रूपयांची प्रथम तरतूद केली आहे, शहर कचरामुक्त केल्यानंतर पुन्हा २.५० कोटी येतील त्यामुळे यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून जव्हार शहर कचरामुक्त करता येईल, याला सर्व नगरसेवकांनी दुजोरा दिला, तसेच नगर परिषदेचा मैला टॅÑक्टर खराब झाला असुन येथे नविन व्हॅक्युम व्हॅन खरेदी करावी असे नगरसेवक कुणाल उदावंत यांनी सूचविले. तसेच शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असुन याकरीता औषध फवारणी वेळोवळी करण्यात यावी अशी सूचना नगरसेवक संकेत माळगावी यांनी दिली.