भरणी करणारा जेसीबी व दोन डम्पर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:15 AM2018-08-20T03:15:50+5:302018-08-20T03:16:17+5:30
पेल्हारमध्ये वनविभागाची कारवाई : धानीव, सातिवली, वसई, विरार फाट्याकडे दुर्लक्ष
पारोळ : वसई तालुक्यातील पेल्हार येथे आदीवासी व्यक्तीने कवडीमोल किमतीला विकासकाला, विकलेल्या वनविभागाच्या सर्व्हेे न. २८२ या जागेवर भराव चालू असताना कारवाई करून दोन डंपर व जेसीबी असा मुद्देमाल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला.
ही जमीन आदीवासी इसमाच्या ताब्यात होती. आदीवासीची जमीन खरेदी करता येत नसताना ही ५० लाख रु पयाची बोलणी करून काही रक्कम देऊन या विकासकांनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवत ही जमीन खरेदी करून चाळी बांधण्यासाठी या ठिकाणी भरावाचे काम चालू केले. मात्र, वनविभागाच्या अधिकाºयांनी कारवाई करुन त्यांचे मनसुबे उद्धवस्थ केले. दरम्यान, पेल्हार, धानिव, विरार फाटा, बावखल या ठिकाणी वनविभागाच्या अधिकारी यांनी काही वर्षा पासून दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे उभी राहिली आहेत. त्याविरोधात तक्रारी होऊनही कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यांची ही कृती चाळमाफियांना पोषक ठरली आहे. वाघ्रालपाड्या सारख्या अनेक चाळी वनविभागाच्या जागेवर उभ्या राहिल्या, यात महानगर पालिकेच्या अधिकाºयांनीही या चाळीना घरपट्टी दिली आहे. तालुक्यात अनेक भूमाफिया सक्र ीय असून आदीवासीच्या नवीन शर्तीच्या जागा विकत घेऊन पेल्हार, धानीव, सातिवली, कामन, वसई फाटा, विरारफाटा, नवजीवन, सोपाराफाटा आदी या परिसरात मोठी अवैध बांधकामें करीत आहेत. तर धानीव गावदेवी मंदिराजवळ वनविभागाच्या जागेवरच चाळीचे राज्य उभे राहीले आहे.