जिजाऊची वर्षा मॅरेथॉन जिंकली ज्ञानेश्वर मोरघाने; सात हजारांहून अधिक स्पर्धक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:15 AM2018-09-03T04:15:03+5:302018-09-03T04:15:14+5:30
जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच विक्र मगड तालुका कला-क्रीडा संस्थेच्यावतीने ‘एक धाव आरोग्यासाठी’ ह्या मॅरेथॉन स्पर्धेत ७ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. जिजाऊ संस्थेचा विद्यार्थी ज्ञानेश्वर मोरघा ह्यांनी खुल्या गटांचे विजेतेपद मिळविले.
पालघर/विक्रमगड : जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच विक्र मगड तालुका कला-क्रीडा संस्थेच्यावतीने ‘एक धाव आरोग्यासाठी’ ह्या मॅरेथॉन स्पर्धेत ७ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. जिजाऊ संस्थेचा विद्यार्थी ज्ञानेश्वर मोरघा ह्यांनी खुल्या गटांचे विजेतेपद मिळविले.
जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांची कन्या तेजस्विनी सांबरे हिच्या वाढदिवसा निमित्त विक्र मगड तालुक्यातील झडपोली येथे ५ वर्षांपासून कोकण वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते .यंदा तिचे उदघाटन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते करण्यात आले होते. ह्यावेळी आशियाई कबड्डीपटू दिनेश शिंदे, गिरीश एरणाक, कुस्तीपटू दिपक सदावर्ते, नगराध्यक्ष रवींद्र खुताडे, सभापती मधुकर खुताडे, सहा.पोनि.मानसिंग पाटील,नासा चे शास्त्रज्ञ पराग दुपारे, प्रमोद पाटील, नरेश अक्रे, रवी पाटील, निलेश औसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुपोषणग्रस्त म्हणूंन ओळखल्या जाणाऱ्या ह्या जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा ह्या महत्वपूर्ण बाबीवर सतत्याने होणारे विनामूल्य काम पाहिल्यावर मी खरच अचंबित झाली असून त्यांच्या कामातून ऊर्जा घेऊन मी पुढे जाणार असल्याचे गौरवोद्गार सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीं ह्यांनी निलेश सांबरे यांच्याबद्दल काढले. झडपोली सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात सीबीएससी सारखी शाळा पाहून मी अचंबित झाली असून इथल्या तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम सुरू असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.त्यांनी तुमच्यासाठी शाळा-महाविद्यालय,रु ग्णालय, यूपीएससी, एमपीएससी अॅकॅडमी, ग्रंथालय आदी महत्वपूर्ण गोष्टींची विनामूल्य उभारणी सांबरे यांनी केली असून त्याचा योग्य वापर करून पुढे यशस्वी व्हा,असा सल्ला त्यांनी धावपटूंना दिला.
विजयी स्पर्धकांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांनी आॅलिम्पिकमधील पदक मिळविण्याची महत्वाकांक्षा ठेवावी असे आवाहन केले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू
१० वर्ष वयोगट - मुले
१) तन्मय संजय गोवारी, मोखाडा
२) आदेश रमेश भोये, भोयेपाडा
३) नवनाथ बारकू डगला, दादडे
१० वर्ष वयोगट - मुली
१) दर्शना रसिक वरठा, दादडे
२) प्रतिज्ञा कृष्णा रावते, दादडे
३) रेणुका दाजी मेठा, डहाणू
१४ वर्ष वयोगट - मुले
१) मनोज तुळशीराम दिघे, विनवळ
२) हनुमान बाबू ताराल, वडपाडा
३) शाम देऊ वाघ, विनवळ
१४ वर्ष वयोगट - मुली
१) कविता शिवराम दंगटे, विनवळ
२) रेश्मा सदानंद वड, सायवन
३) कुसुम मावजी घाटाल, आंबिस्ते
१७ वर्ष वयोगट - मुले
१) नागेश मोतीराम भुयाल, कुंजपाडा
२) शिवराम जयराम वारघडे, सवरखांड
३) नितेश अर्जुन भोरे, मान
१७ वर्ष वयोगट - मुली
१) श्रद्धा मधुकर पारधी, विक्र मगड
२) अर्चना नरेश खुताडे, विक्र मगड
३) वृषाली प्रकाश डगले,वज्रेश्वरी
१९ वर्ष वयोगट - मुले
१) अंकित भास्कर भोरे, देहरे
२) विशाल शंकर वळवी, विनवळ
3) सचिन रामा गोविंद, झडपोली
खुला - पुरु ष गट
१) ज्ञानेश्वर विठ्ठल मोरघा,
जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी
२) कमळू कल्लू लोते, नाशिक
३) कांतीलाल देवराम कुंभार
खुला - महिला गट
१) रिशु सिंग, नाशिक, २) भारती मनोहर गोंडे , ३) जयश्री नारायण भुजाडे