‘जिजाऊ’चे काम महाराष्ट्राला प्रेरणादाई - आमदार कडू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:01 AM2019-06-24T00:01:52+5:302019-06-24T00:02:24+5:30

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणा वर चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्यव्यवस्था आदी सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर इथल्या सर्वसामान्य गरिबानी कोणाकडे बघावे?

'Jijau' work is inspiration for Maharashtra - MLA Kadu | ‘जिजाऊ’चे काम महाराष्ट्राला प्रेरणादाई - आमदार कडू

‘जिजाऊ’चे काम महाराष्ट्राला प्रेरणादाई - आमदार कडू

Next

पालघर : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणा वर चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्यव्यवस्था आदी सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर इथल्या सर्वसामान्य गरिबानी कोणाकडे बघावे? असा प्रश्न उपस्थित करून छत्रपतींनी महाराष्ट्रासाठी जे काम केले तेच काम आज जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असल्याने महाराष्ट्रासाठी हे प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार आमदार बच्चू कडू यांनी काढले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोलीच्या वतीने आरोग्य व निसर्गाचा महायज्ञ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्र मात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जेष्ठ पत्रकार शिवाजीराव मोहिते, निवृत्त लष्करी अधिकारी रमाकांत पाटील, डॉ. हेमंत सवरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशातील कार्यकर्ता संपलेला आहे, निवडणूका संपल्या की मतदारसंघात नेताही फिरकत नाही अशी आज अवस्था आहे. आज अनेकांकडे पैसा आहे पण समाजीक बांधिलकी जपत सर्वसामान्यासाठी खर्च करण्याची दानत नसते. निलेश सांबरें सारखी माणसे निस्वार्थ भावनेने आज समाज बदलण्याचे काम करत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे, असेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी आयोजित महाआरोग्य शिबिरात कुपोषण, कॅन्सर, दमा, हृदयविकार, रक्तसंस्था, मूत्रसंस्था, स्नायुसंस्था व मुलांमध्ये आढळणाºया सर्व आजारांवर मुंबईतील बालाजी, रहेजा व फोर्टिस हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी या तपासणीत एखादा आजारी मूल आढळल्यास त्याच्यावर जिजाऊ संस्थेच्यावतीने विनामूल्य उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचारासाठी रु ग्णालयात नेण्यास वाहन उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रसूती सह गंभीर रु ग्णांना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळता यावे यासाठी ठाणे - पालघर जिल्ह्यात ५ सुसज्ज रु ग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. एका फोनवर तात्काळ विनामूल्य अशी ही रु ग्णवाहिका रु ग्णांच्या दारात पोचणार आहे. निसर्गाच्या संवर्धन व शेतकरी सशक्तीकरणासाठी जिजाऊ संस्थेतर्फे तब्बल एक लाख उत्तम दर्जाच्या आंबा, काजू, मोगरा, शेवगा, जांभूळ अशा विविध फळझाडांचेही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच महिला सक्षमीकरणासाठी व स्वयंरोजगारासाठी महिलांना शिलाई मशिन, पीठ गिरणी अशा विविध उपयुक्त वस्तूंचेही यावेळी वाटप करण्यात येत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक स्वागतार्ह पाऊल उचलल्याचे पाहून आमदारानी आनंद व्यक्त केले.

योजनांवर कोट्यवधी खर्च होऊन उपयोग काय

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला ठाणे - पालघर जिल्हा व कोकण प्रांत आजही विकासापासून वंचित आहेत याची खंत आमच्या मनात कायम आहे. शासन कोट्यवदी रु पयांच्या योजना राबवत असते. मात्र या जनतेपर्यंत व्यवस्थीत पोहोचत नाही हे दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी विक्र मगडमधील रु ग्णाला वाड्यात योग्य उपचार न करता मोडक्या
रु ग्णवाहिकेतून ठाण्यात पाठवण्यात आले. त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघून थरकाप उडत होता.


पैशांपेक्षा माणसांचा जीव वाचणे महत्वाचे आहे. म्हणूनच जिजाऊ संस्थेतर्फे आणखीन ५ सुसज्ज रुग्णवाहिका कोकणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जनतेचा व कोकणाचा सर्वांगिण विकास जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कोकणातील गावागावात अधिकारी निर्माण करून येथील गरिबी दूर करायचे आमचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केले. या कार्यक्र मास हजारो महिला व शेतकºयांनी उपस्थिती दर्शवत निसर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा केली.

Web Title: 'Jijau' work is inspiration for Maharashtra - MLA Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.