पालघरात जेएनपीटी मुर्दाबाद

By admin | Published: June 17, 2017 01:15 AM2017-06-17T01:15:06+5:302017-06-17T01:15:06+5:30

भाजपा सरकारने तीन वर्षात राबविलेल्या योजना आणि विकास कामा संदर्भातील संमेलन असे गोंडस नाव सुचवून त्या आडून जेएनपीटीच्या कारवायांना ‘सुकर’ मार्ग

JNPT Murdabad in Palghar | पालघरात जेएनपीटी मुर्दाबाद

पालघरात जेएनपीटी मुर्दाबाद

Next

हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : भाजपा सरकारने तीन वर्षात राबविलेल्या योजना आणि विकास कामा संदर्भातील संमेलन असे गोंडस नाव सुचवून त्या आडून जेएनपीटीच्या कारवायांना ‘सुकर’ मार्ग निर्माण करून देण्याचा कार्यक्रमामध्ये घुसून मच्छीमार, शेतकरी, आदिवासी, डायमेकर आदी शेकडो आंदोलकांनी ‘जेएनपिटी मुर्दाबाद’ च्या घोषणा देऊन आपला निषेध नोंदवला. विशेष म्हणजे ह्या कार्यक्र माला निमंत्रण पत्रिकेत नावे असलेल्या सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचे टाळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन वर्षा च्या कारिकर्दीत केलेल्या विकास कामांची व योजनांची जंत्री सर्वसामान्य आणि आपल्या पदाधिकाऱ्या पर्यंत पोहचिवण्याच्या दृष्टीने आज नवली च्या दादोबा ठाकूर सभागृहात ‘सबका साथ सबका विकास’ अश्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ज्या वाढवणं बंदर उभारणीला जिल्ह्यातील प्रत्येक भागातून विरोध होत असताना हे बंदर उभारण्याचा ठेका दिलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) कडे आजच्या कार्यक्र माचे आयोजन पद देण्यात आल्याने जिल्ह्यातून संतप्त भावना उमटल्या होत्या.
केंद्र, राज्य शासनाच्या निर्देशाने जेएनपीटी समूह बंदर उभारून इथला मच्छीमार, शेतकरी, आदिवासी, डाय मेकर, बागायतदार आदीं सह त्यांचा व्यवसाय उध्वस्त करायला निघालेला असताना जिल्ह्यातील त्यांच्या प्रत्येक कारवायाला विरोध करण्याची भूमिका संघर्ष समितीने घेतलेली आहे.केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रसिद्धी करायला इतर वेळा शासकीय निधी चा हवा तसा खर्च केला जात असताना ह्या कार्यक्र मासाठी जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेली जेएन पिटी चा वापर का? केला जातो असा उिद्वग्न सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
कार्यक्र माला सुरु वात झाल्या नंतर सर्वांनी एक साथ उठून जेएनपिटी विरोधात घोषणा दिल्या. ह्यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील,अशोक अंभिरे, वैभव वझे, मच्छीमार कृती समिती अध्यक्ष नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, राजन मेहेर, रविंद्र म्हात्रे, ज्योती मेहेर, अनिल चौधरी, सुधीर तामोरे, मानेन्द्र आरेकर, जगदीश नाईक, जयकुमार भाय, भूमीसेना अध्यक्ष काळू राम धोदडे, कष्टकरी संघटनेच्या मधूताई धोडी ई. सह शेकडो आंदोलकांनी जेएनपीटीला इशारा देत कारवाया थांबविण्याची समज दिली. ह्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आयोजकांनी घेतला बॅनरबाजीचा आधार : कार्यक्र माचे प्रवेशद्वारापासून ते थेट संपूर्ण सभागृह जेएनिपटीच्या कार्याबद्दलच्या बॅनरने भरल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता कार्यक्र माला सुरु वात होण्या अगोदर वाढवणं बंदर विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, भूमीसेना, कष्टकरी संघटना, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, आदिवासी एकता परिषद, युवा भारत, पर्यावरण संवर्धन समिती, वसई आदी संघटनांच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यासाठी सभागृहात प्रवेश केला.

खासदारांचे तळात मळ्यात
महत्वाचे म्हणजे वाढवण बंदराच्या सुरु वातीच्या काळा पासून खासदार चिंतामण वणगा हे ह्या बंदराला विरोध करीत असताना त्यांनी घेतलेल्या ह्या कार्यक्र मासाठी त्यांना जे एन पिटी ची मदत घ्यावीशी वाटल्या बद्दलही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मी वाढवणं बंदराच्या विरोधात असून जनते बरोबर असल्याचे खासदारांनी सांगितले.

Web Title: JNPT Murdabad in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.