वैतरणा नदीतून रेतीउत्खनन सुरूच

By admin | Published: June 15, 2017 02:30 AM2017-06-15T02:30:32+5:302017-06-15T02:30:32+5:30

वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या खालून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक सुरु

Jordan continued Vaitarana retiutkhanana | वैतरणा नदीतून रेतीउत्खनन सुरूच

वैतरणा नदीतून रेतीउत्खनन सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या खालून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक सुरु असून पुलाजवळील प्रतिबंधित क्षेत्रात दिवसा ढवळ्या रेती उत्खनन सुरु आहे. यामुळे रेल्वे पुलाला असलेला धोका दिवसेंदिवस वाढत असून प्राणहान घडल्यानंतरच महसूल आणि रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत काय? जिल्हाधिकारी प्रतिबंधक आदेश काढून तर रेल्वे प्रशासन पुलाला कोणताही धोका नसल्याचे मोघम उत्तर देऊन प्रवाशांच्या जीवितांशी जीवघेणा खेळ खेळत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटने नंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलाचे स्ट्रुक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई-गुजरात-दिल्ली आदी राज्यांना जोडणारा सफाळे-वैतरणा पूल पश्चिम रेल्वे चा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरलेला आहे.शंभर वर्षाचे आयुमान असलेला हा ९२ व ९३ क्रमांकाचा ब्रिटिश कालीन पूल ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटाचा मारा आणि रेल्वेच्या शेकडो फेऱ्याचा भार सांभाळून जीर्ण झाला आहे. या पुलाचे आयुष्यमान घटल्याने बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम रेल्वे आणि ठेकेदारांच्या आठमुडे धोरणामुळे जवळपास ७ वर्षापासून बंद आहे.
या पुलाखाली आणि आसपासच्या प्रतिबंधित भागात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन होत असल्याच्या तक्र ारी नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी महसूल, रेल्वे प्रशासन, पोलीस इ. ची बैठक घेऊन व मोठ्या प्रमाणात वसई, पालघरमधील रेती बंदरावर चोरट्या पद्धतीने चालू असलेल्या रेती उत्खनना वर धाड घालून अनेक बोटी,सक्शन पंप,व इतर सामग्री नष्ट केली होती.व प्रत्येक बंदरात सीसी टीव्ही कॅमेरे,कारवाई टीम नियुक्त केल्या होत्या. त्यामुळे सर्व बंदरावरील चोरटी रेती वाहतूक ठप्प पडली होती. त्यांची बदली झाल्यानंतर रेतीचोरांविरोधात महसूल विभागाने आवळलेला फास हळूहळू सैल होत चालल्याचे निदर्शनास येत असून सफाळे-वैतरणा पुलाच्या आजूबाजूच्या प्रतिबंधित क्षेत्रा मध्ये दिवसा ढवळ्या रेती उत्खनन सुरु झाले आहे. वाढीव बेटाच्या संरक्षित बंधाऱ्या लगतची रेती काढली जात असल्याने या गावातील सुमारे दोन हजार लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थ अनेक महिन्यापासून करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज महसूल विभागाच्या कानापर्यंत पोहचूनही कारवाई करण्यासाठी आमच्याकडे पर्याप्त साधने नसल्याची ओरड सफाळ्याचे मंडळ अधिकारी, तलाठी करीत आले आहेत. त्यामुळेच चोरट्या रेतीची वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे पुलाच्या खालून रेती वाहतूक व उत्खनन सुरु असताना त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी जिल्हाधिकारी फक्त वैतरणा पुला खालून नौकानयनास आणि ६०० मीटर्स प्रतिबंधित भागात रेती उत्खननास बंदी असल्याचा मनाई आदेश काढून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत असल्याची भावना बाधित लोक व्यक्त करीत आहेत. त्याचा गैरफायदा रेतीमाफिया आणि त्यांना मदत करणारे काही अधिकारी उचलीत असल्याने रेल्वे पुलाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

राज्यसरकार आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलीत असून या ढकला ढकलीत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या हकनाक बळी जाणार आहे.
- प्रथमेश प्रभुतेंडुलकर,
सहसचिव, डहाणू वैतरणा प्रवासी संघ

या बेकायदेशीर रेती उत्खननामुळे आमच्या वाढीव गावाचा बंधारा खचत चालल्याची तक्र ार करूनही तिची दखल घेतली जात नाही.
- दशरथ किणी, गोकुळ भगत,
ग्रामस्थ, वाढीव

Web Title: Jordan continued Vaitarana retiutkhanana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.