डहाणूची महालक्ष्मी यात्रा ३० मार्चपासून, लाखो भाविक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:15 AM2018-03-19T03:15:10+5:302018-03-19T03:15:10+5:30

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच आदिवासींचे कुलस्वामिनी असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सावाला ३० मार्चपासून सुरुवात होत आहे.

The journey of Dahanu's Mahalakshmi will reach lakhs of devotees from March 30 | डहाणूची महालक्ष्मी यात्रा ३० मार्चपासून, लाखो भाविक येणार

डहाणूची महालक्ष्मी यात्रा ३० मार्चपासून, लाखो भाविक येणार

Next

- शौकत शेख
डहाणू: महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच आदिवासींचे कुलस्वामिनी असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सावाला ३० मार्चपासून सुरुवात होत आहे. तरी यात्रेच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे ग्रामपंचायत, डहाणू पंचायत समिती, डहाणू तहसलदारांकडून जय्यत तयारीसाठी संवंधितांना आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्वात मोठी यात्रा असल्याने तिचे भाविकांना मोठे आकर्षण असते. येथील लोक कुटुंबांसह येथे येतात त्यामुळे यात्रेला शोभा आलेली असते. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाका येथून तीन कि.मी. अंतरावरील महालक्ष्मी मातेचे प्रशस्थ मंदिर आहे. येथे दररोज मुंबई तसेच गुजरातकडे जाणारे असंख्य भाविक मातेचे दर्शन घेऊनच पुढे जातात.
देवीची यात्रा चैत्र महिन्यात अर्थात ३० मार्चला सुरु होत असून ती १८ दिवस चालते. बारशीच्या उत्सवाला हजारो आदिवासींची येथे गर्दी होते. तसेच यात्रेदरम्यान नवस फेडण्यासाठी भाविक अनेक दिवस येथे मुक्काम करतात. गुजरात येथील सुरत, नवसारी, बलसाड, वापी, संजान उमरगाव येथील भाविक येथे मुक्कामाला असतात. १६ एप्रिल पर्यंत ही यात्रा चालणार आहे.
महालक्ष्मी मातेचा पहीला होम ३१ मार्च (शनिवार) रोजी होणार असल्याने प्रशासन कामाला लागले आहे. रविवार दि. ८ एप्रील रोजी अष्टमीच्या दुसऱ्या हवनाची सुरवात होईल . दरम्यान, १९ मार्च रोजी डहाणूचे सहा. जिल्हाधिकारी आंचल गोयल, तहसीलदार राहुल सारंग, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर, कासा पोलिस निरिक्षक जयप्रकाश गुठे, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट यांची आढावा बैठक होणार आहे.

Web Title: The journey of Dahanu's Mahalakshmi will reach lakhs of devotees from March 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.